Thursday, November 7, 2024
Homeपब्लिक फिगरतळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील...

तळियेच्या ग्रामस्थांचे सांगतील तेथे पुनर्वसन!

रायगड जिल्ह्यातल्या तळिये गावातल्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून दिली जातील व ते सांगतील तेथे त्यांचे पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकारतर्फे त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

कोकणातील पूरग्रस्त भागाच्या दौर्‍याचा प्रारंभ आज तळिये, या गावातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुरूकेला. देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्यासोबत होते.

या गावांतील परिस्थिती अतिशय भीषण आहे. पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किमीपर्यंत वाहून गेले आहेत. गावात झालेले नुकसानसुद्धा प्रचंड आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी तातडीने येथे पोहोचले आणि त्यांनी प्रशासन लवकर पोहोचावे, असा प्रयत्न केला, असे फडणवीस यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.

आज प्राधान्य लोकांना तातडीने मदत करण्याला असले पाहिजे आणि पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह सार्‍याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत. या लोकांना एनडीआरएफचे अनुदानही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

ही वेळ कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठिशी उभे राहण्याची ही वेळ आहे. भाजपाकडूनही शक्य ती तातडीची मादत पोहोचवी जात आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content