Homeचिट चॅटजिल्हा युवा महोत्सवातल्या...

जिल्हा युवा महोत्सवातल्या सहभागासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत करा नोदणी

युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्याच्या हेतूने दरवर्षी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव या वर्षी  ७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुकांनी आपली नोंदणी येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत  https://forms.gle/Kmof5utKSuEqL3P69 या गुगल फॉर्मद्वारे करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  प्रा. मार्क धरमाई यांनी केले आहे.

राष्ट्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या कार्यक्रमाअंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२५-२६मधील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे राष्ट्रीय आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ यादरम्यान होणार असून त्यासाठी जिल्हास्तरीय निवड करण्याकरीता या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वक्तृत्व, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत १५ ते २९ वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. या स्पर्धांबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaicity.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content