मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने स्वरसंचित, ह्या कार्यक्रमात ग्वाल्हेर, किराणा, आणि आग्रा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका, विदुषी अलका देव मारुलकर यांच्या गायनाचे ध्वनिमुद्रण प्रसारित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता होईल.
विदुषी अलका देव मारुलकर यांनी संगीताचे शिक्षण त्यांचे वडील पं. राजाभाऊ देव व पं. मधुसूदन कानिटकर यांच्याकडून घेतले. त्यांनी शास्त्रीय संगीतावर विपुल लेखन केले असून नवीन रागांची निर्मिती केली आहे. ठुमरी, कजरी, होरी अशा संगीताच्या उपशास्त्रीय प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

ह्या कार्यक्रमाची लिंक आपल्याला संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर कार्यक्रमाच्या एक दिवस आधी उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क करावा.

