मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी “स्वरसंचित” या शीर्षकाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जुन्या ध्वनिमुद्रित मैफिलीच्या उपक्रमाअंतर्गत रविवार दिनांक १५ ऑागस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक कै. पं. काशिनाथ बोडस यांची ध्वनिमुद्रित मैफल सादर होणार आहे.
ख्याल, तराणा, भजन सादर करण्याची त्यांची खासियत होती. सुप्रसिद्ध गायिका कै. वीणा सहस्रबुद्धे या त्यांच्या भगिनी आणि शिष्याही होत्या. यू ट्यूब प्रणालीवरून प्रसारित होणाऱ्या या मैफलीची लिंक कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रसिकांना दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. गानरसिकांनी या मैफलीचा आनंद घ्यावा असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.