Homeकल्चर +जयश्री पाटणेकर यांची...

जयश्री पाटणेकर यांची ध्वनिमुद्रित मैफिल १३ जूनला!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी `स्वरसंचित’ या शीर्षकाअंतर्गत दूरदृश्य प्रणाली पद्धतीने जुन्या ध्वनिमुद्रित मैफिली सादर करण्यात येतात. या उपक्रमाअंतर्गत येत्या रविवारी, १३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी जयश्री पाटणेकर यांची ध्वनिमुद्रित मैफल सादर होणार आहे.

या मैफलीची लिंक कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रसिकांना दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या www.dadarmatungaculturalcentre.org  या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तरी गानरसिकांनी या मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content