आरईसी लिमिटेडच्या संचालक मंडळाने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या कालावधीसाठी आणि तिमाहीसाठी अलेखापरिक्षित अंतरिम एकत्रित वित्तिय निष्कर्षांना नुकतीच मान्यता दिली. या तिमाहीत कंपनीने आतापर्यंतचा सर्वाधिक 10,003 कोटी रुपये नफा नोंदवला आहे.
परिचालन आणि आर्थिक ठळक मुद्दे:
आर्थिक वर्ष 24 तिसरी तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 23ची तिसरी तिमाही FY23 (स्टँडअलोन)
कर्ज मंजुरी: 1,32,049 कोटी रुपये विरुद्ध 47,712 कोटी रुपये, 177% वाढ, अक्षय ऊर्जा क्षेत्र 57%
वितरण: 46,358 कोटी रुपये विरुद्ध 29,639 कोटी रुपये, 56% वृद्धी
कर्ज मालमत्तेवरील व्याजाचे उत्पन्न: 11,812 कोटी रुपये विरुद्ध 9,660 कोटी रुपये, 22% वृद्धी
निव्वळ नफा: 3,269 कोटी रुपये विरुद्ध 2,878 कोटी रुपये, 14% वाढ
परिचालन आणि आर्थिक ठळक मुद्दे: आर्थिक वर्ष 24 मधील नऊ महिन्यांचा कालखंड विरुद्ध आर्थिक वर्ष 23 मधील नऊ महिने (स्टँडअलोन)
कर्ज मंजुरी: 3,25,941 कोटी रुपये विरुद्ध 1,92,496 कोटी रुपये, 69% वाढ,अक्षय ऊर्जा क्षेत्र 39%
वितरण: 1,22,089 कोटी रुपये विरुद्ध 59,907 कोटी रुपये, 104% वृद्धी
कर्ज मालमत्तेवरील व्याजाचे उत्पन्न: 33,490 कोटी रुपये विरुद्ध 28,456 कोटी रुपये, 18% वृद्धी
निव्वळ नफा: 10,003 कोटी रुपये विरुद्ध 8,054 कोटी रुपये, 24% वाढ
मालमत्तेच्या गुणवत्तेत झालेली वाढ, व्याजदरात झालेली वृद्धी आणि वित्तीय पुरवठा खर्चाचे प्रभावी व्यवस्थापन या सर्व घटकांमुळे आरईसी 9 महिन्यांमधील आतापर्यंतचा सर्वाधिक 10,003 कोटी रुपये इतका नफा नोंदवू शकली. या सर्वांच्या परिणाम स्वरूप, 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या कालावधीसाठी प्रति समभाग होणारी वार्षिक कमाई (ई पी एस) 31 डिसेंबर 2022पर्यंत प्रति समभाग 40.79 रुपयांच्या तुलनेत 50.65 रुपये प्रति समभाग इतकी झाली.
नफ्यात झालेल्या वृद्धीमुळे, 31 डिसेंबर 2023पर्यंत निव्वळ संपत्ती 64,787 कोटी रुपये झाली आहे असून यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 18% वाढ झाली आहे.
कर्ज खात्याने आपला वाढीचा दर कायम ठेवला आहे आणि 31 डिसेंबर 2022 पर्यंत 4.11 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 21% ची वाढ नोंदवत 4.97 लाख कोटी रुपये झाली आहे. मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा दर्शवत असल्याने, 31 डिसेंबर 2023 पर्यंत अनुत्पादक मालमत्तेवर 70.41% च्या मालमत्ता कव्हरेज गुणोत्तरासह 31 डिसेंबर 2022 रोजी 1.12% वरून निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 0.82%पर्यंत कमी झाली आहे.
भविष्यातील वाढीला पाठबळ देण्यासाठी अपार संधींकडे निर्देश करत, 31 डिसेंबर 2023 रोजी कंपनीचे भांडवली पर्याप्तता गुणोत्तर (CRAR) 28.21% इतके आहे.