भारतातील घरांच्या किंमतींमध्ये २०२३च्या पहिल्या तिमाहीदरम्यान मोठी वाढ झाली असून सर्व प्रमुख रिअॅल्टी बाजारपेठांमध्ये सरासरी किंमतवाढ जवळपास वार्षिक ७ टक्के असल्याचे प्रॉपटायगरडॉटकॉमच्या अलिकडील अहवालातून निदर्शनास आले आहे.
अहवालामधून निदर्शनास येते की, बेंगळुरूमधील मालमत्तांच्या सरासरी किंमतीत गेल्या वर्षभरात १० टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे ही मालमत्ता किंमतींमध्ये मोठी वाढ दाखवणारी बाजारपेठ ठरली. किंमतवाढीसंदर्भात पुणे व अहमदाबाद या दक्षिण बाजारपेठेच्या जवळ होते. या बाजारपेठांमधील सरासरी मालमत्ता किंमतींमध्ये अनुक्रमे ८ टक्क्यांची व ७ टक्क्यांची वाढ झाली.
प्रॉपटायगरडॉटकॉम, हाऊसिंगडॉटकॉम आणि मकानडॉटकॉमचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी विकास वाधवान म्हणाले की, रिअल इस्टेट हा दीर्घकाळापासून सतत सर्वोत्तम कामगिरी करणारा मालमत्तावर्ग आहे आणि वाढत्या किंमतींसह गृहखरेदीदारांसाठी झेप घेत त्यांचे स्वप्नवत घर खरेदी करण्याकरिता ही उत्तम संधी असू शकते. असे असले तरी घर खरेदी करणे हा कुटुंबाने घेतलेला सर्वात महागडा निर्णय असतो हे लक्षात असणेदेखील आवश्यक आहे. म्हणून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व साधकबाधक गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. अहवालामधून निदर्शनास येते की, कच्च्या मालाची किंमत व मजुरीमध्ये सतत होणारी वाढ, कोविडनंतर घरांची वाढती मागणी आणि यंदा मार्चमध्ये सरकारी अनुदान योजना बंद, यासह अनेक कारणांमुळे भारतात घर खरेदीची किंमत वाढत आहे.
प्रॉपटायगरडॉटकॉम, हाऊसिंगडॉटकॉम आणि मकानडॉटकॉमच्या संशोधन प्रमुख अंकिता सूद म्हणाल्या की, गेल्या वर्षभरापासून भारतीय शहरांमधील मालमत्तेच्या किंमती ६ ते ७ टक्क्यांसह झपाट्याने वाढत आहेत आणि घरमालकीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. इनपुट खर्चात वाढ होण्याव्यतिरिक्त योग्य उत्पादनाचा मर्यादित पुरवठा आणि अंतिम वापरकर्त्यासाठी रेडी टू मूव्ह इन प्रकल्प यामुळे किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

रोचक बाब म्हणजे भारित सरासरी किंमती मार्च तिमाहीमध्ये वार्षिक ६ टक्क्यांनी वाढल्या असताना गुरूग्राम, त्यानंतर बेंगळुरू यासारख्या शहरांमधील प्रमुख सूक्ष्म-बाजारपेठांमध्ये अनुक्रमे वार्षिक १३ टक्क्यांची व १० टक्क्यांची वाढ दिसण्यात आली आहे. मागणी-पुरवठामधील तफावतीचे सध्याचे बाजारपेठ ट्रेण्ड्स पाहता आम्हाला अपेक्षा आहे की, मालमत्ता किंमती जवळच्या रेंजमध्ये वाढत राहतील, जेथे दर्जेदार रेडी-टू-मूव्ह-इन विभाग प्रीमियम स्वरूपात व्यापार करेल, असेही त्यानी स्पष्ट केले.
अहवालामधून निदर्शनास येते की, अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली एनसीआर, कोलकाता व पुणे अशा शहरांमधील प्रति चौरस फूट सरासरी किंमतीत लक्षणीय वाढ दिसण्यात आली आहे.
मार्च २०२३ पर्यंतची किंमत रूपये/चौ.फूटमध्ये | ||
शहर | २०२३च्या पहिल्या तिमाहीत सरासरी किंमत (प्रति चौरस फूट रूपयांमध्ये) | वार्षिक बदल (टक्केवारीमध्ये) |
अहमदाबाद | ३७००-३९०० | ७ टक्के |
बेंगळुरू | ६२००-६४०० | १० टक्के |
चेन्नई | ५७००-५९०० | १ टक्के |
दिल्ली एनसीआर | ४७००-४९०० | ६ टक्के |
हैदराबाद | ६२००-६४०० | ४ टक्के |
कोलकाता | ४६००-४८०० | ६ टक्के |
मुंबई | १०२००-१०४०० | ५ टक्के |
पुणे | ५८००-६००० | ८ टक्के |
भारत | ७०००-७२०० | ६ टक्के |