Homeचिट चॅट1 डिसेंबरपासून राष्ट्रपती...

1 डिसेंबरपासून राष्ट्रपती भवन जनतेसाठी खुले!

दिल्लीतले राष्ट्रपती भवन येत्या 1 डिसेंबर 2022पासून आठवड्यातून पाच दिवस जनतेसाठी खुले राहील. राष्ट्रपती भवनला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार (राजपत्रित सुट्ट्या वगळता) या दिवशी वेळेच्या पाच स्लॉटमध्ये म्हणजे सकाळी 10 ते 11, 11 ते 12, दुपारी  12 ते 1, 2 ते 3 आणि 3 ते 4 या वेळेत भेट देता येईल.

राष्ट्रपती भवनला भेट देण्याव्यतिरिक्त, मंगळवार ते रविवार (राजपत्रित सुटी वगळता) आठवड्यातून सहा दिवस राष्ट्रपती भवन संग्रहालय संकुलालादेखील लोकांना भेट देता येईल.

दर शनिवारी, लोकांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सकाळी 8 ते 9 या वेळेत चेंज ऑफ गार्ड सोहळादेखील पाहता येईल. राजपत्रित सुट्टी असल्यास किंवा राष्ट्रपती भवनाने तसे सूचित केले असल्यास शनिवारी हा सोहळा होणार नाही.

http://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour या संकेतस्थळावर अभ्यागत त्यांचे स्लॉट ऑनलाईन आरक्षित करू शकतात.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content