राष्ट्रपती भवन सामान्य जनतेसाठी येत्या शनिवारपासून म्हणजे 6 फेब्रुवारी पासून पुन्हा खुले होणार आहे. कोविड-19मुळे 13 मार्च 2020पासून ते बंद करण्यात आले होते. शनिवार आणि रविवारी (सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस सोडून) ते खुले राहणार आहे. अभ्यागतांना https://presidentofindia.nic.in किंवा https://rashtrapatisachivalaya.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपल्या भेटीची आगाऊ नोंदणी करता येईल. पूर्वीप्रमाणेच 50 रुपये फी यासाठी आकारली जाईल.
शारीरिक अंतराच्या निकषानुसार 10:30, 12:30, 4:30 या वेळांत आगाऊ नोंदणी नक्की करत येईल. जास्तीतजास्त 25 जणांना एका निर्धारित वेळी प्रवेश दिला जाईल. भेटीदरम्यान अभ्यागतांना मास्क घालणे, शारीरिक अंतर पाळणे या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल.