Homeकल्चर +रामदास आठवले म्हणतात...

रामदास आठवले म्हणतात ‘Gadar 2’ करा करमुक्त!

गदर 2 चित्रपट सर्वत्र करमुक्त व्हावा आणि त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळावा, ही माझी मागणी आहे, असे ट्विट रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक  अनिल शर्मा आणि सनी देओलला टॅग केले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याचबरोबर आठवले यांनी या चित्रपटातल्या कलाकार टीमबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत.

गदर 2चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या चित्रपटाला केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून मिळालेल्या समर्थनाबद्दल ट्विट शेअर केले आहे. ते म्हणाले की, रामदास आठवलेजी, मला आणि गदर 2च्या संपूर्ण टीमला देशभक्तीने प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद.

सनी देओल-अमिषा पटेल स्टारर ‘गदर 2’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या चित्रपटाने अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम स्टारर ‘OMG 2’ला बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर दिली. मात्र, ‘गदर 2’च्या वादळासमोर कोणीही टिकू शकलेले नाही. 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये सनी देओलचा गदर 2 सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं होतं. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील हा सिनेमा पाहिला आहे. या चित्रपटाच्या टीमची त्यांनी भेट घेतली. त्याचबरोबर चित्रपटाचे समर्थन करत शासनाकडे काही मागण्यादेखील केल्या आहेत.

गदर 2च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 500 कोटी क्लबमध्ये एंट्री करेल. गदर 2 हा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. गदर 2ने 19व्या दिवशी 5.10 कोटी रुपये जमा केले आहेत. आता या सिनेमाच्या एकूण कमाईबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाने 465.75 कोटींची कमाई केली आहे. तो लवकरच 500 कोटींचा टप्पा गाठेल.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content