Homeकल्चर +राज ठाकरेंनी केले...

राज ठाकरेंनी केले अनिता पाध्येंच्या ‘प्यार जिंदगी है’चे प्रकाशन!

ज्येष्ठ सिने पत्रकार व लेखिका अनिता पाध्ये यांच्या ‘प्यार जिंदगी है’ या नव्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मंगळवारी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्य साधून अनौपचारिकरित्या करण्यात आले.

शर्मिला ठाकरे, मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर तसेच संगीतकार जतिन पंडीत, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, गीतकार मेहबूब आलम कोतवाल इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अनिता पाध्ये यांची पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचं लिखाण अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीतलं असल्याने पुस्तक संपूर्ण वाचल्याशिवाय ठेवलं जात नाही. हे पुस्तकही त्याच दर्जाचं असेल, मी वाचल्यानंतर त्यावर माझा अभिप्राय देईन, असे उद्गार राज ठाकरे यांनी यावेळी काढले.

लेखिका अनिता पाध्ये म्हणाल्या की, ‘राज ठाकरे यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. त्यांच्या शुभहस्ते प्रकाशित झालेल्या माझ्या सर्व पुस्तकांना लोकाश्रय मिळविला आहे. त्यांच्याकडून माझ्या साहित्यकृतींचे प्रकाशन व्हावे ही माझी कायम ईच्छा असते. आज ते प्रचंड व्यस्त असूनही हा सोहळा ‘शिवतीर्थ’वर करण्यासाठी मला परवानगी देऊन माझ्या ‘प्यार जिंदगी है’ पुस्तकाचा आणि माझ्या लेखनकलेचा सन्मान केला आहे.

‘प्यार जिंदगी है’ या पुस्तकात 12 लोकप्रिय हिंदी रोमॅन्टिक चित्रपटांचा निर्मिती प्रवास असल्याने ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून पुस्तकाचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी दिलवाले दुल्हनिया ले जायंगे… मधील एक गाणे संगीतकार जतीन यांचे चिरंजीव राहुल यांनी गाऊन सर्वांची वाहवा मिळविली.

चित्रपटांशी नाळ जोडलेल्या भारतीय प्रेक्षकांना रोमॅन्टिक चित्रपट फार जवळचे आहेत. ज्यांचं प्रेम सफल झालेलं असतं ते तर रोमॅन्टिक चित्रपटांमधील नायक-नायिकांशी, रुपेरी पडद्यावरील त्यांच्या प्रेमाची आपल्या प्रेमाशी साधर्म्य शोधत असतात तर ज्यांचं प्रेम विफल झालं असतं असे प्रेक्षक प्रेमपटातील सफल प्रेम पाहून आपल्या दु:खी मनावर फुंकर घालत असतात. अनिता पाध्ये यांचे नवं मराठी पुस्तक ‘प्यार जिंदगी है’मधील चित्रपटांच्या सुरस कथाप्रवासात ते निश्चितच गुंतून जातील.

देवदास, आराधना, बॉबी, एक दूजे के लिए, तेरे घर के सामने, कभी कभी, अनुपमा, छोटी सी बात, आशिकी, कयामत से कयामत तक, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हम दिल दे चुके सनम आदी 12 लोकप्रिय हिंदी चित्रपटांचा निर्मिती प्रवास, या चित्रपटांची वैशिष्ट्यं, सामाजिक मूल्य, हे चित्रपट बनत असताना घडलेल्या अनेक खऱ्या आणि रंजक घटना ‘प्यार जिंदगी है’मध्ये वाचायला मिळतील. ३२७ पाने आणि दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रे व रेखाचित्रांमुळे हे पुस्तक आणखी मौल्यवान झाले आहे.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content