Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या १२ हजार...

मुंबईतल्या १२ हजार झाडांची छाटणी पूर्ण

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्‍हणून मोठ्या झाडांच्‍या, विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्‍या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून सुरू आहेत. यंदा मुंबई महानगरात एकूण एक लाख ११ हजार ६७० झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १२ हजार ४६७ झाडांची छाटणी झाली आहे. ७ जूनपर्यंत उर्वरित ९९ हजार २०३ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण वृक्षांपैकी १ लाख ८५ हजार ९६४ झाडे रस्त्यांच्या कडेला आहेत. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करुन छाटणीची कामे निश्चित करण्यात येतात. जी झाडे लहान असतात, ज्यांच्यापासून कोणताच धोका नसतो, अशांचा सर्वेक्षणात विचार केला जात नाही.

या प्रक्रियेनुसार, उद्यान विभागाने यंदा मुंबईतील आकाराने मोठ्या अशा सुमारे १ लाख ८६ हजार २४६ वृक्षांचे सर्वेक्षण केले. त्यात, रस्‍त्‍यांच्‍या कडेला सुमारे १ लाख ११ हजार ६७० झाडे आहेत. ५ एप्रिल २०२४पर्यंत १२ हजार ४६७ झाडांच्या फांद्या छाटणी करण्‍यात आली आहे. ७ जून २०२४ अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्‍या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये याकामी यंत्रसामुग्री, मनुष्‍यबळ उपलब्‍ध आहे. त्याचप्रमाणे, खासगी गृहनिर्माण संस्थांनी पालिकेची पूर्वपरवानगी घेऊन झाडांची सुयोग्य छाटणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

उद्यान विभागाकडून करण्यात येणाऱ्या पावसाळापूर्व कामांमध्‍ये प्रामुख्याने मृत तसेच धोकादायक असलेल्या झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांचे निर्मूलन, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांच्या ढोली व पोकळ्या भरण, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे / खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदींचा समावेश आहे.

१ हजार ८५५ जणांना नोटीस

सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा पालिकेद्वारे नियमितपणे घेण्यात येत असते. तथापि, गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय – निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या वृक्षांच्‍या छाटणीकामी, संतुलित करण्यासाठी पालिकेने १ हजार ८५५ नोटीस जारी केल्‍या आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक कारणांनी झाडे उन्मळून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी पालिकेच्या पूर्वपरवानगीने आपल्या परिसरातील अतिशय वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहनही उद्यान अधीक्षक परदेशी यांनी केले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content