Saturday, September 14, 2024
Homeबॅक पेजशांततेचा जागर: गांधी...

शांततेचा जागर: गांधी पदकासाठी दहा चित्रपटांमध्‍ये स्पर्धा!

गोव्यातल्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित ICFT–UNESCO गांधी पदकासाठी नामांकन मिळवलेले आणि स्पर्धांमध्ये सहभाग असलेले जगभरातील दहा विविध चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. यात युनेस्कोने मान्यता दिलेल्या महात्मा गांधींच्या कालातीत आदर्शांचा समावेश असून त्यांतून, गांधींच्या तत्त्वज्ञानाचा प्रतिध्वनी उमटलेला आहे. तसेच एकोपा, समजूतदारपणा आणि शांतता रुजलेल्या विश्वाचे समर्थ चित्रण केले आहे. या गांधी पदकासाठी दहा चित्रपटांमध्‍ये स्पर्धा आहे.

विशेष करून संघर्ष आणि अराजकतेने वेढलेल्या या जगात शांतता, सहिष्णुता, अहिंसा आणि करुणा या तत्त्वांप्रती आपली चेतना पुनर्प्रस्थापित करणारे उत्कृष्ट चित्रपट या, स्पर्धेसाठी निवडलेले गेले असून या चित्रपटांतून ते दीपस्तंभासारखे दिसून येत आहेत. या वर्षी, जगातील विविध कोनाकोपऱ्यातून आलेल्या या पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुढील दहा उल्लेखनीय चित्रपटांत स्पर्धा होणार आहे.

1. मुयाद अलायान यांचा ‘ए हाउस इन जेरुसलेम’, (पॅलेस्टाईन, यूके, जर्मनी, नेदरलँड, कतार, 2022)

हा चित्रपट जेरुसलेममधील परस्परविरोधी संस्कृती आणि विश्वासांच्या पार्श्वभूमीवर मानवी नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचा शोध घेतो. हा चित्रपट शहराच्या ऐतिहासिक आणि राजकीय तणावादरम्यान व्यक्तींच्या संघर्ष आणि आकांक्षांचे चित्रण करतो.

2. टिनाटिन कज्रिश्विली यांचा ‘सिटिझन सेंट’ (जॉर्जिया, 2023)

जॉर्जियामध्ये तयार केलेला, हा चित्रपट सामाजिक आव्हानांमध्ये नैतिक अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. यात वैयक्तिक त्याग आणि धार्मिकतेच्या शोधाचे मार्मिक चित्रण केले आहे.

3. अँथनी चेन यांचा ‘ड्रिफ्ट’ (यूके, फ्रान्स, ग्रीस, 2023)

विविध देशांमधील जीवन गुंफणारे कथन, ओळख, आपलेपणा आणि त्यातून घेतलेला मानवी शोध हा या चित्रपटाचा विषय आहे. जीवनातील अनिश्चिततेतून अनपेक्षित बंध कसे निर्माण होऊ शकतात याचे चित्रण हा चित्रपट करतो.

4. अपोलिन ट्रओरे यांचा “इट्स सिरा” (फ्रान्स, जर्मनी, सेनेगल, 2023)

विविधांगी-सांस्कृतिक दृष्टीकोनातून, भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून सामायिक मानवी अनुभवांच्या समायोजनावर प्रकाश टाकत या चित्रपटाची कहाणी उलगडत जाते.

5. ओव्ह मस्टिंग यांचा ‘कालेव्ह’ (एस्टोनिया, 2022)

एस्टोनियामध्ये चित्रित केलेला, हा चित्रपट देशाच्या सांस्कृतिक सारांशामध्ये गुंतलेली कथा विणतो. यात वैयक्तिक आणि सामूहिक ओळखीच्या गुंफलेल्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय इतिहासाशी निगडित वैयक्तिक प्रवासाचे चित्रण प्रतिबिंबित झाले आहे.

6. पॉल फौजान अगुस्ता यांचा ‘द प्राइज’(इंडोनेशिया, 2022)

महत्वाकांक्षेच्या गुंतागुंतीची आणि यशाच्या शोध घेणारी इंडोनेशियातील ही एक कथा. ओळख आणि कर्तृत्वाचा शोध घेत असलेल्या व्यक्तींना तोंड द्याव्या लागणाऱ्या  असलेल्या नैतिक दुविधांचा अभ्यास हा चित्रपट दाखवतो.

7. जॉन टॉर्नब्लॅड यांचा ‘द शुगर एक्सपेरिमेंट’ (स्वीडन, 2022)

स्वीडनमध्ये निर्माण केलेला हा चित्रपट सामाजिक नियम आणि वैयक्तिक निवडींवर प्रकाश टाकतो. सामाजिक रचनांसह वैयक्तिक प्रयोग प्रस्थापित प्रतिमानांना कसे आव्हान देऊ शकतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

8. राकेश चतुर्वेदी ओम यांचा ‘मंडली’ (भारत, 2023)

भारतामध्ये रुजलेला, हा चित्रपट मैत्री, निष्ठा आणि वैयक्तिक विकासाच्या प्रदेशामधून मार्गक्रमण करतो. यात नातेसंबंधांची परिवर्तनशील शक्ती आणि त्याचा उत्प्रेरित प्रवास समाविष्ट आहे.

9. विष्णू शशी शंकर यांचा ‘मलिकापुरम’ (भारत, 2022)

केरळच्या भारतीय सांस्कृतिक वातावरणातला  हा चित्रपट सामाजिक अपेक्षांमधील नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचे चित्रण करतो. हे मानवी संबंधांच्या भावनिक बंधांवर आणि त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या संघर्षांचे चित्रण करतो.

10. सायंतन घोसन यांच्‍या ‘रवींद्र काव्य रहस्य’ (भारत, 2023)

भारतातील बंगालच्या,पार्श्वभूमीवर वरील हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेचे सार अंतर्भूत करतो, मानवी भावना आणि नातेसंबंधांमधील मूळ रहस्ये उलगडतो.

हे अनमोल चित्रपट प्रेक्षकांना मोहित करतात, सामूहिक कृतींना प्रेरणा देण्यासाठी, एका चांगल्या जगाचे पालनपोषण करण्यासाठी आणि मानवतेचे सार साजरे करण्यासाठी जगातील “शांततेचे” महत्त्व अधोरेखित करतात. ICFT पॅरिस आणि UNESCO यांच्या द्वारे पुरस्कृत केलेले गांधी पदक ही महात्मा गांधींच्या शांतता आणि अहिंसेच्या दृष्टीकोनाचे उत्कृष्ट प्रतिबिंब असलेल्या चित्रपटासाठी IFFIमधून सादर केली जाणारी वार्षिक आदरांजली आहे. 1994 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, या पुरस्काराने या चिरस्थायी मूल्यांना मूर्त रूप देणाऱ्या चित्रपटांचा नेहमीच गौरव केला आहे.

Continue reading

नोटा उडवणाऱ्या शिवसैनिकांची होणार हकालपट्टी!

ठाण्याच्या आनंदाश्रमात ढोलताशांच्या तालावर नोटा उधळणाऱ्या कथित शिवसैनिकांची चौकशी चालू असून या लोकांना पक्षातून ताबडतोब काढून टाकले जाईल, अशी घोषणा शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. https://youtube.com/shorts/AEdfBCtuU4Y मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात आणि त्यांच्या दैवताच्या आनंदाश्रमात केवळ पैसेच उडवले...

वांद्र्याचा नाला खुलला बोगनवेलीने..

मुंबईतल्या पश्चिम महामार्गावर खेरवाडीजवळ असलेला जवळजवळ अर्धा किलोमीटरचा नाला अलीकडे नव्याने बंद करण्यात आला. या नाल्यावर मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने नुकतेच सुशोभिकरण केले. बहरलेल्या बोगनवेलीच्या झाडांनी तसेच टोपियारींनी हा नाला आता असा खुलून...

मुंबईत ईदची सुट्टी १८ तारखेला!

राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये येत्या सोमवार, १६ सप्टेंबरऐवजी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद, हा मुस्लिमधर्मियांचा सण मुस्लिम...
error: Content is protected !!
Skip to content