Homeटॉप स्टोरीराहुल गांधींच्या अध्यक्षपदाला...

राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला पृथ्वीराज चव्हाण यांचा उघड विरोध!

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची नेमणूक करण्याचे सर्वाधिकार काँग्रेसच्या अध्यक्षांना देण्यापासून राहुल गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमण्याच्या ठरावावर बैठकीला उपस्थित असलेले नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे विरोध केला तर अनेक नेत्यांनी बैठकीलाच दांडी मारल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रांताध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

सदर बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याचे बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. पण, प्रत्यक्षात हे दोन्ही ठराव मांडल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून कौलच दिला नाही, तर यशोमती ठाकूर, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, त्यांचे बंधू आमदार धीरज देशमुख आदी नेते बैठकीला हजरच राहिले नव्हते. काँग्रेसच्या ४४ आमदारांपैकी जेमतेम १०-१५ आमदारच या बैठकीला उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले.

भाई जगताप यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून लवकरच डच्चू मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे ते बैठकीकडे फिरकलेच नाहीत. विश्वजीत कदम हे दोन्ही ठराव मंजूर झाल्यानंतर बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार बैठकीला हजर होते. परंतु मंचावर ते गेलेच नाहीत. या दोघांना मंचावर येण्यासाठी अनेकदा विनवणी करण्यात आली. मात्र, त्यांनी आपला निर्णय बदलला नाही, असे समजते.

प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. सर्व प्रदेश प्रतिनिधींनी हा ठराव एकमताने मंजूर केला.

काँग्रेस अध्यक्षपदी खासदार राहुल गांधी यांची नियुक्ती करावी असा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. हा ठराव सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला, असे बैठकीनंतर सांगण्यात आले.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content