Homeएनसर्कलपंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेशात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्ट, 2023 रोजी मध्य प्रदेशचा दौरा करणार आहेत. ते दुपारी 2:15 वाजता, सागर जिल्ह्यात पोहोचतील. तिथे ते संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारक स्थळी  भूमिपूजन करतील. पंतप्रधान दुपारी 3:15 च्या सुमारास ढाना येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. तिथे ते संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी स्मारकाची पायाभरणी करतील.

महान संत आणि समाजसुधारकांचा सन्मान करणे हे पंतप्रधानांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. याच दृष्टीकोनाला अनुसरून संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी यांचे स्मारक 11.25 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर आणि 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून आकाराला येणार आहे. या भव्य स्मारकामध्ये संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास जी यांचे जीवन, तत्वज्ञान आणि शिकवण यांचे दर्शन घडवणारे  एक प्रभावी कला संग्रहालय आणि दालन असेल. स्मारकाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी यात भक्त निवास, भोजनालय आदी सुविधा असतील.

पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान, 4000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील आणि पायाभरणी करतील.

कोटा-बिना रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून हा प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. हा प्रकल्प अंदाजे 2475 कोटींहून अधिक खर्चातून उभारला आहे. हा राजस्थानमधील कोटा आणि बारन आणि मध्य प्रदेशातील गुना, अशोकनगर आणि सागर जिल्ह्यातून जातो. अतिरिक्त रेल्वे मार्गामुळे चांगल्या वाहतुकीची क्षमता वाढेल आणि मार्गावरील रेल्वेगाड्यांचा वेग सुधारण्यासही मदत होईल.

पंतप्रधान, 1580 कोटींहून अधिक खर्चाच्या दोन रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये मोरीकोरी-विदिशा-हिनोतिया यांना जोडणारा चौपदरी रस्ता प्रकल्प आणि हिनोतिया ते मेहलुवा यांना जोडणारा रस्ता प्रकल्प यांचा समावेश आहे.

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content