Homeन्यूज ॲट अ ग्लांसपंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वायनाडच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी, 10 ऑगस्टला केरळच्या वायनाड भागातल्या आपदाग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमध्ये तीन गावं गाडली गेली होती. त्यामध्ये साधारणतः ४०० जणांचा मृत्यू झाला तर १५२हून जास्त लोक आजही बेपत्ता आहेत.

वायसेनेचे तसेच लष्कराचे जवान, राष्ट्रीय आपदा बचाव दलाचे (एनडीआरएफ), एसडीआरएफ तसेच इतर बचावयंत्रणांकडून आजही तेथे बचावकार्य सुरूच आहे. केरळ सरकारने आता या जवानांबरोबरच बेपत्ता असलेल्या लोकांचे नातेवाईक तसेच इतर लोकांचीही मदत याकामी घेतली आहे. अतिमुशळधार पावसामुळे वायनाड परिसारत ३१० हेक्टवरील फळबागा जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या या दौऱ्यात या साऱ्या नुकसानीबरोबरच तेथील बचावकार्याचा आढावाही घेणार असल्याचे कळते.

दोनच दिवसांपूर्वी वायनाडचे खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्या भगिनी व काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी वायनाडला भेट देऊन तिथल्या आपदग्रस्त भागातल्या लोकांशी बातचीत केली होती.

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content