Homeएनसर्कलकला आणि परंपरा...

कला आणि परंपरा जोपासण्यावर पंतप्रधान मोदींचा भर!

सरदार पटेल यांची जयंतीमित्त आयोजित करण्यात आलेल्या अंगाई लेखन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील बी. एम. मंजुनाथजी यांनी पटकावले आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या ‘मलगू कन्दा’, या अंगाईसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देश्यून केलेल्या मन की बात, या कार्यक्रमात याची घोषणा केली. आजच्या संवादात पंतप्रधानांनी कला आणि परंपरा जोपासण्यावर भर दिला.

सरदार पटेल यांची जयंती अर्थात ‘एकता दिवस’चे औचित्य साधत ‘मन की बात’मध्ये आम्ही तीन स्पर्धांची घोषणा केली होती. या स्पर्धेत देशभक्तीपर गाणी, अंगाई, आणि रांगोळी, यांचा समावेश होता. देशभरातील 700हून अधिक जिल्ह्यांतील 5 लाखांहून अधिक लोकांनी यात सहभाग घेतला आहे. त्यांनी 20हून अधिक भाषांमध्ये आपल्या प्रवेशिका पाठवल्या, असे ते म्हणाले.

ही अंगाई लिहिण्याची प्रेरणा त्यांना त्यांची आई आणि आजींनी गायलेल्या अंगाईमधून मिळाली आहे.

“निज रे माझ्या बाळा,

माझ्या शहाण्या बाळा, निज तू,

सांज होऊन मिट्ट काळोख पसरला आहे,

निद्र देवी येईल,

चांदण्याच्या बागेतून, स्वप्ने घेऊन येईल,

निज रे बाळा, निज रे बाळा,

जोजो…जो..जो..
जोजो…जो..जो..”

आसाममधील कामरूप जिल्ह्यातील दिनेश गोवाला यांनी या स्पर्धेत दुसरे पारितोषिक पटकावले आहे. त्यांनी लिहिलेल्या अंगाईमध्ये मातीची आणि धातूची भांडी बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या लोकप्रिय कलाकृतीचा ठसा आहे.

कुंभार दादा झोळी घेऊन आले आहेत,

झोळीमध्ये काय आहे?

कुंभाराची झोळी उघडून पाहिले तर,

झोळीत होती सुंदरशी वाटी!

आमच्या छकुलीने कुंभाराला विचारले,

कशी दिली ही छोटीशी वाटी!

गाणी आणि अंगाईप्रमाणेच रांगोळी स्पर्धाही खूप गाजली. सहभागींनी एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या काढून पाठवल्या. यामध्ये पंजाबच्या कमल कुमार विजेते ठरले. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अमर शहीद वीर भगतसिंग यांची अतिशय सुंदर रांगोळी काढली होती. महाराष्ट्रातील सांगली येथील सचिन नरेंद्र अवसारी यांनी आपल्या रांगोळीत जालियनवाला बाग, तेथील हत्याकांड आणि शहीद उधम सिंग यांचे शौर्य चित्रित केले होते. गोव्याचे रहिवासी गुरुदत्त वांटेकर यांनी गांधीजींची रांगोळी काढली, तर पुद्दुचेरीतील मालतीसेल्वम यांनीही अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांवर लक्ष केंद्रित केले.

देशभक्तीपर गीत स्पर्धेच्या विजेत्या टी. विजय दुर्गा या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्यांनी तेलुगुमध्ये प्रवेशिका पाठवली होती. त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नरसिंह रेड्डी गारू यांच्याकडून त्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे. तुम्हीही ऐका विजय दुर्गांच्या प्रवेशिकेचा हा भाग…

रेनाडू प्रांताचा सूर्य,

हे शूर नरसिंहा!

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तुम्ही अंकुर आहात, अंकुश आहात!

इंग्रजांच्या अन्यायकारक आणि निरंकुश दडपशाही पाहून

तुमचे रक्त खवळले आणि आगीचा डोंब उसळला!

रेनाडू प्रांताचा सूर्य,

हे शूर नरसिंहा!

तेलुगुनंतर आता मी तुम्हाला मैथिलीमधील एक ध्वनिफीत ऐकवतो. ही दीपक वत्स यांनी पाठवली आहे. या स्पर्धेत त्यांनीदेखील बक्षीस पटकावले आहे.

भारत जगाचा अभिमान आहे,

आपला देश महान आहे,

तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला,

उत्तरेकडे विशाल कैलाश आहे,

गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी,

कोशी, कमला बलान आहे,

आपला देश महान आहे.

तिरंग्यात आमचा प्राण आहे..

स्पर्धेत आलेल्या अशा प्रवेशिकांची यादी खूप मोठी आहे. तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन, तुमच्या कुटुंबासह या प्रवेशिका पाहा आणि ऐका, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

हे पुरस्कार कला आणि संगीत जगताची लोकप्रियता वाढवण्यासोबतच त्यांना समृद्ध करण्यातदेखील आपला हातभार लावत आहेत. आता तुम्ही सर्व ही धून नीट ऐका… हे कोणते वाद्य आहे तुम्हाला माहीत आहे का? शक्यता फारच कमी आहे! या वाद्याचे नाव ‘सुरसिंगार’ असून ही धून जयदीप मुखर्जी यांनी संगीतबद्ध केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्काराने सन्मानित तरुणांमध्ये जयदीप यांचा समावेश आहे. 50 आणि 60च्या दशकापासूनच हे वाद्य ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले होते, पण सुरसिंगारला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी जयदीप प्रयत्नशील आहेत. 

त्याचप्रमाणे उप्पलपू नागमणी यांचा प्रयत्नदेखील खूप प्रेरणादायी आहे. त्यांना मँडोलिनमध्ये कर्नाटक शैलीतील वादनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. दुसरीकडे संग्रामसिंह सुहास भंडारे यांना वारकरी परंपरेतील कीर्तनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या यादीत केवळ संगीताशी निगडीत कलाकार नाहीत. व्ही दुर्गा देवी यांना ‘करकट्टम’ या प्राचीन नृत्यप्रकारासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

या पुरस्काराचे आणखी एक विजेते, राज कुमार नायक यांनी तेलंगणातील 31 जिल्ह्यांमध्ये 101 दिवस चालणाऱ्या पेरीनी ओडिसीचे आयोजन केले होते. आज लोक त्यांना पेरिनी राजकुमार या नावाने ओळखतात. पेरिनी नाट्यम, शंकराला समर्पित एक नृत्य आहे जे काकतीय राजवटीत खूप लोकप्रिय होते. या घराण्याची मुळे आजच्या तेलंगणाशी संबंधित आहेत. साइखौमसुरचंद्रासिंह हे आणखी एक पुरस्कार विजेते आहेत. हे मैतेईपुंग वाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. हे वाद्य मणिपूरचे आहे. पूरण सिंग हा दिव्यांग कलाकार आहे, जो राजुला-मालुशाही, न्यौली, हुडका बोल, जागर अशा विविध संगीत प्रकारांना लोकप्रिय करत आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक ध्वनिफीतदेखील त्यांनी तयार केल्या आहेत. पूरण सिंह यांनी उत्तराखंडच्या लोकसंगीतात आपली प्रतिभा दाखवून अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. हे सर्व कलाकार, प्रयोगिक कलेला अधिक लोकप्रिय करण्यासाठी तळागाळातील प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

डिजिटल इंडियाची शक्ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात विविध अॅप्सचा मोठा वाटा आहे. असेच एक अॅप म्हणजे ई-संजीवनी. या अॅपवरून टेलि-कन्सल्टेशन, म्हणजे दूर बसून, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, तुम्ही तुमच्या आजाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. आतापर्यंत हे अॅप वापरणाऱ्या टेलि-कन्सल्टेशनची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

आमच्या देशात अशा अनेक महान परंपरा आहेत ज्या नष्ट झाल्या होत्या, पण लोकांच्या स्मरणातून त्या निघून गेल्या होत्या. परंतु आता लोकसहभागाच्या शक्तीतून त्यांना पुनरूज्जीवत करण्याचे प्रयत्न होत आहेत. अमेरिकेत वास्तव्य करणारे कंचन बॅनर्जी यांनी परंपरेच्या संरक्षणाशी जोडल्या गेलेल्या अशाच एका अभियानाकडे माझं लक्ष वेधलं आहे. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात बासबेरियामध्ये, या महिन्यात त्रिबेनी कुंभो मोहोत्शव याचं आयोजन केलं होतं. त्यात आठ लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. तब्बल 700 वर्षांनी ही प्रथा पुनरूज्जीवित केली आहे. दुर्दैवानं बंगालच्या त्रिबेनीमध्ये होणारी ही प्रथा 700 वर्षांपूर्वी बंद झाली होती. तिला स्वातंत्र्यानंतर सुरू करायला हवं होतं. परंतु तेही करण्यात आलं नाही. दोन वर्षांपूर्वी, स्थानिक लोक आणि त्रिबेनी कुंभो पॉरिचालोना शॉमितीच्या माध्यमातून हा महोत्सव पुन्हा सुरू झाला आहे. आपण केवळ एक परंपरा पुनरूज्जीवित करत नाहीत तर आपण भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं संरक्षणही करत आहात, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

त्रिबेनीला अनेक शतकांपासून एक पवित्रस्थळ म्हणून ओळखलं जातं. त्याचा उल्लेख, वेगवेगळ्या मंगलकाव्ये, वैष्णव साहित्य, शाक्त साहित्य आणि इतर बंगाली साहित्यिक कृतींमध्येही आढळतो. वेगवेगळ्या ऐतिहासिस दस्तऐवजांमधून याचा शोध लागतो की, एकेकाळी हे क्षेत्र संस्कृत, शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचं केंद्र होतं. अनेक संतांनी या क्षेत्राला माघ संक्रांतीमध्ये कुंभ स्नानासाठी पवित्र स्थान मानलं आहे. त्रिबेनीमध्ये आपल्याला गंगा घाट, शिवमंदिर आणि टेराकोटा वास्तुकलेनं सजलेली प्राचीन इमारती पाहायला मिळतील. त्रिबेनीची परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि कुंभ परंपरेचा गौरव पुनरूज्जीवित करण्यासाठी गेल्या वर्षी इथं कुंभ मेळ्याचं आयोजन केलं होतं. सात शतकांनंतर, तीन दिवस कुंभ महास्नान आणि मेळ्यानं, या क्षेत्रात एका नव्या उर्जेचा संचार केला आहे. तीन दिवस रोज होणारी गंगा आरती, रूद्राभिषेक आणि यज्ञात मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले. यावेळी महोत्सवात वेगवेगळे आश्रम, मठ आणि आखाडेही सहभागी झाले होते. बंगाली परंपरांशी जोडल्या गेलेल्या अनेक विधी जसे की कीर्तन, बाऊल, गोडियो नृत्ये, स्री खोल, पोटेर गान, छोऊ नृत्य, सायंकाळच्या कार्यक्रमांचं आकर्षणांचं केंद्र बनले होते. आमच्या युवकांना देशाच्या इतिहासाशी जोडण्याचा हा एक स्पृहणीय प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content