Homeचिट चॅटअखिल भारतीय कीर्तन...

अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये यांचे निधन

मुंबईतल्या दादर येथील ८२ वर्षीय जुनी सुप्रसिद्ध अखिल भारतीय कीर्तन संस्था, या नामांकीत संस्थेचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे सुरेश उपाध्ये यांचे शुश्रुषा रुग्णालयात गुरुवारी सकाळी निधन झालं.

शिक्षकी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आपल्या जीवनाचा उर्वरीत काळ त्यांनी कीर्तन संस्थेला दिला. कीर्तन संस्थेचा आर्थिक तसेच सर्व प्रकारचा कारभार त्यांनी निस्पृहपणे चोखपणे सांभाळला. उत्तम वक्तृत्त्व, शिस्तप्रिय आणि मोत्यासारखे सुंदर अक्षर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच लयीत, एका ओळीत, सुबकपणे सर लिहीत. आजपर्यंत अनेक कीर्तनकार घडवण्यात तसेच कीर्तन संस्थेचे वर्षभर विविध उपक्रम त्यांनी राबवले. आजारपणातसुद्धा कीर्तन संस्थेचाच विचार त्यांच्या मनात होता.

संस्थेच्या आणि त्यांच्याशी निगडित संस्थांच्या वतीने २० डिसेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात डी. एल. वैद्य मार्ग, दादर येथे शोकसभेचे आयोजन केले असल्याचं संस्थेचे प्रमुख विश्वस्त रवींद्र आवटी यांनी सांगितले.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content