Homeटॉप स्टोरीसुभाष देसाईंच्या सहभागाने...

सुभाष देसाईंच्या सहभागाने शिवसेनेकडून मविआ आंदोलनाची औपचारिकता!

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर मलिक यांना समर्थन देण्यासाठी मविआचे नेते व कार्यकर्ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमा झाले खरे, पण सर्वांना उत्सुकता राहिली ती शिवसेनेच्या सहभागाची. अखेर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई धरण्यात सहभागी झाले आणि साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर काल या आंदोलनाची घोषणा केली होती. त्याप्रमाणे सकाळी १० वाजता राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते म. गांधी यांच्या पुतळ्यासमोर हजरही झाले. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे मंत्री घटनास्थळी दाखल झाले. परंतु शिवसेनेच्या कोणा मंत्र्यांचा थांगपत्ता लागेना. नाही म्हटले तर शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि प्रा. मनीषा कायंदे तेव्हढ्या आंदोलनात सहभागी झाल्या. शिवसेनेचे बहुतांश मंत्री त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री प्रकृतीच्या कारणास्तव आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणारच नव्हते. शरद पवार वयोमानामुळे सहभागी झाले नाहीत. आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. अनिल परब भराडीदेवीच्या आंगणेवाडी जत्रेसाठी सिंधुदूर्गात होते. त्यामुळे या आंदोलनात शिवसेना आहे की नाही, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा लगबगीने उद्योगमंत्री सुभाष देसाई आंदोलनात सहभागी झाले आणि उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद…

नवाब मलिक जिंदाबाद… ईडी मुर्दाबाद… मोदी सरकार हाय हाय… मोदी सरकार चोर है… महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा… महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार… आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा.. अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी, पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयाजवळचा महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून सोडला.

देसाई

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसेपाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक, नगरसेवक कप्तान मलिक, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, सुभाष देसाई, सुनील राऊत, मनीषा कायंदे, सचिन अहिर, यामिनी जाधव, योगेश कदम, विनोद घोसाळकर आदी यात सहभागी झाले होते. एकूण पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते या आंदोलनात सहभागी झालेले दिसले. शिवसेनेकडून फक्त सुभाष देसाईच एकमेव मोठे नेते या आंदोलनात दिसले.

मलिकांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही : बाळासाहेब थोरात

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारच्या ह्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून भाजपाला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा आणि आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आंदोलन केले पाहिजे, असे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content