Homeएनसर्कलवर्ल्ड फूड इंडिया...

वर्ल्ड फूड इंडिया संमेलनाचे तयारी शिबीर नाशिकमध्ये संपन्न!

नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसह (केसीसीआय I) केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने नाशिक येथे अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रांच्या प्रादेशिक उद्योग संमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे 3-5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार्‍या वर्ल्ड फूड इंडिया 2023 हा या प्रादेशिक संमेलनाचा मुख्य विषय होता. या भव्य कार्यक्रमात नाशिकमधील उद्योग हितधारकांचा सहभाग असणार आहे.

या संमेलनाला उपस्थित प्रमुख पाहुणे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सनोज कुमार झा यांनी नाशिकच्या अन्न प्रक्रिया उद्योगाच्या हितधारकांशी संवाद साधला आणि त्यांना वर्ल्ड फूड इंडिया 2023 मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. अन्न प्रक्रिया उद्योगातील हितधारकांशी संवाद साधण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी उत्पादक, अन्न प्रक्रिया करणारे, वाईनवर प्रक्रिया करणारे, उपकरणे उत्पादक, लॉजिस्टिक कंपन्या, शीतसाखळी कंपन्या, तंत्रज्ञान प्रदाते, अकादमी, स्टार्ट-अप्स आणि नवोन्मेषक, अन्न किरकोळ विक्रेते इ.सर्व हितधारकांना एक अनोखे व्यासपीठ देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे या भव्य खाद्यपदार्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, असे सनोज कुमार झा यांनी अधोरेखित केले.

हा कार्यक्रम मान्यवरांची, जागतिक गुंतवणूकदारांची आणि प्रमुख जागतिक आणि देशांतर्गत खाद्य कंपन्यांच्या व्यावसायिक प्रमुखांची आजवरची सर्वात मोठी परिषद असणार आहे, ही परिषद भारताला जागतिक खाद्यपदार्थांच्या परिदृश्यावर ठळकपणे आणेल, असे ते म्हणाले.

या संमलेनाला प्रादेशिक संघटना आणि उद्योगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अतिशय महत्त्वाच्या प्रादेशिक उद्योग संमेलनात एकूण 70 उद्योग सहभागी झाले होते.

महाराष्ट्र सरकारचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी देखील नाशिकस्थित अन्न प्रक्रिया उद्योगांना स्थानिक ते जागतिक दृष्टीकोन प्राप्त करण्याच्या दृष्टीने वर्ल्ड फूड इंडिया 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे संचालक संजय कुमार सिंह; इन्व्हेस्ट इंडियाच्या वरिष्ठ गुंतवणूक विशेषज्ञ राधिका मेहता; फिक्कीच्या व्यापार व्यवहार विभागाचे सहसंचालक मयंक रस्तोगी या संमेलनात संवाद साधण्यासाठी उपस्थित होते.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content