Thursday, January 23, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे...

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचे निधन

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे (वय ७३) यांचे गुरुवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, दोन बंधू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पायगुडे यांनी सरस्वती मंदिर शाळेतून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. क्रीडा पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी त्यांनी क्रीडा समालोचक म्हणून काम केले. उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांची ओळख होती.

पायगुडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, प्रमुख कार्यवाह आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह म्हणून काम पाहिले. त्यांनी क्रीडा समालोचक म्हणून ही जबाबदारी पार पाडली. जाहिरात व्यवसायात प्रभात पब्लिसिटी या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. स्टुडिओ एलकॉमचे संचालक होते. अनेक वृत्तपत्रात आणि मासिकात त्यांनी लेखन केले. त्यांचे साहित्य वारी घुमान वारी हे पुस्तक प्रकाशित झाले. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य होते. स्याटरडे क्लब, रोटरी क्लब, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आदी संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता.

चतुरस्त्र आणि जगन्मित्र असलेले व्यक्तिमत्व दूर गेले..

आमच्या ‘स्याटर्डे क्लब’चे सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सचिव आणि पुणे शहरातील क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात भरपूर संचार असणारे प्रकाश पायगुडे यांचे काही महिन्यांच्या आजारपणानंतर निधन झाले. एक विवेकी, संयमी आणि हसतमुख व्यक्तिमत्व आपल्यातून कायमचे दूर निघून गेले आहे. आम्ही सर्वांनीच एक अतिशय साधा व सरळ आणि खूप जुना मित्र गमावला आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत कोठडिया यांनी व्यक्त केली आहे.

प्रकाश पायगुडे यांचं काल निधन झालं. एक चांगला सहृदयी माणूस आपल्यातून गेला. डॉ. माधवी वैद्य मसापच्या कार्याध्यक्ष असताना पायगुडे प्रमुख कार्यवाह होते. या दोघांच्या नेतृत्त्वाखाली मला मसापच्या ग्रंथालय विभागाचा कार्यवाह, तसेच महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा संपादक म्हणून काही काळ काम करता आलं. दोघांनीही मसापसाठी अनेक चांगल्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या, अनेक संशोधन प्रकल्प राबवले. ‘भारतीय भाषांतील स्त्रीवादी साहित्य’ हा त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह असताना त्यांनी ‘अक्षरयात्रा’ या महामंडळाच्या वार्षिकाचंही तीन वर्षे संपादन केलं होतं. या सर्व कामांत माधवीताई आणि प्रकाश पायगुडे यांनी मला सामावून घेत अनेक नव्या गोष्टी करण्याची संधी दिली. डॉ. सतीश देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्यात झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, तसेच घुमान आणि पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही आम्ही एकत्र काम केलं होतं. पुण्याच्या सार्वजनिक, सांस्कृतिक विश्वात त्यांचा दीर्घकाळ वावर होता. ‘पुण्यभूषण’सहित अनेक संस्थांच्या कामात त्यांचं योगदान होतं. सार्वजनिक संस्थेमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना चांगल्या कामासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आणि समन्वयाची भूमिका ठेवावी लागते, ती पायगुडे यांच्यामध्ये होती. त्यातूनच त्यांनी अनेक माणसे जोडली होती, असेही त्यांच्या एका चाहत्याने सांगितले.

Continue reading

अजित घोष ट्रॉफी महिला क्रिकेटः साईनाथ स्पोर्ट्सला विजेतेपद

सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला. सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या...

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड,...

घोष ट्रॉफी क्रिकेटः डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियनही उपांत्य फेरीत

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेतील शेवटच्या दोन साखळी लढतींमध्ये भामा सी. सी.ने डॅशिंगवर २५ धावांनी मात करत गटामध्ये अव्वल...
Skip to content