Homeकल्चर +मातृदिनानिमित्त 'जननी'चे पोस्टर रिलीज!

मातृदिनानिमित्त ‘जननी’चे पोस्टर रिलीज!

अल्पावधीत प्रेक्षक पसंती मिळविणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने मातृदिनाचे औचित्य साधत त्यांच्या ‘जननी’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आणि आयेशा झुल्का यांच्या भावमुद्रा असलेले ‘जननी’चे हृदयस्पर्शी पोस्टर सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधत असून मातृत्व प्रेमाचे भावबंध अधोरेखित करणारी विलक्षण कथा घेऊन जननी लवकरच ‘अल्ट्रा झकास’, या मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, आयेशा झुल्का यांसह अभिनेते मोहनीश बहल, अमन वर्मा, विनीत रैना आणि सोनिका हंडा या कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन चंदर एच. बहल यांनी केलं आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आईच्या आपल्या मुलांवरील प्रेमाचा आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या आईच्या मातृत्वाची कथा ‘जननी’ चित्रपटात उत्तमपणे मांडण्यात आली आहे. मूळ हिंदी असलेला हा चित्रपट संपूर्णपणे मराठी भाषेत पाहता येणार आहे.

कलाकारांची उत्तम फळी लाभलेला आमचा हा चित्रपट मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. तत्कालीन परिस्थितीत सरोगसीसारख्या विषयावर प्रकाश टाकणारा विषय आम्ही ‘जननी’ चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला होता. आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाता येणार असल्याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

App link:

https://ultrajhakaas.app.link

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content