Skip to content
Homeकल्चर +पोराचा बाजार उठला...

पोराचा बाजार उठला रं…

जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षकगीत रिलीझ करण्यात आलं. त्यापाठोपाठ आता याच चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं ‘पोराचा बाजार उठला रं..’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

सूरज चव्हाण, जुई भागवत आणि इंद्रनील कामतवर चित्रित या गाण्यात या तिघांचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतोय. गाण्यात प्रेमाचा त्रिकोण आपण पाहू शकतो. अभिनेत्री जुईवर सूरज आणि इंद्रनीलचा जीव जडलाय. जुईची दोघांसोबत अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळते, जी खूप सुंदर दिसत आहे. पण विशेष म्हणजे जुईचा शिफॉन सारीमधला कातिल लूक आकर्षणाचा विषय ठरतोय. या गाण्याचे बोल आणि त्याची चाल प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय. गाण्याचा हुकस्टेपसुद्धा सर्वांना थिरकवणारा आहे. कलाकार आणि संगीतासोबतच या गाण्याचं चित्रिकरणसुद्धा तितकच सुंदर आहे. ह्या गाण्याला करण सावंत ह्यांनी गायलं आहे तर संगीत आणि बोल कुणाल करण ह्यांचं आहे.

‘पोराचा बाजार उठला रं..’ हे गाणं रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. गाणं पाहून सिनेरसिकांची ‘झापुक झुपूक’ सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात एक से बढकर एक इतर कलाकार आहेत जसे हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी.. जे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...