Homeकल्चर +बेलापूरमध्ये ‘आझादी का...

बेलापूरमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त छायाचित्र प्रदर्शन!

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क कार्यालय, पुणे व पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आतापर्यंत अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी माहितीवर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन नवी मुंबईमधील बेलापूरच्या केंद्रीय सदन येथे कालपासून सुरू झाले आहे.

स्वातंत्र्य संग्रामातील दुर्लक्षित नायक अर्थात अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान लक्षात आणून देणे, हा उद्देश यामागे आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय 23 ते 29 ऑगस्ट आठवडा “आयकॉनिक वीक” म्हणून साजरा करत आहे. याअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत.

या चित्रप्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग आणि विशेष अथिती म्हणून सीआरपीएफ, पश्चिम विभागाचे आयजीपी रणदीप दत्ता उपस्थित होते.

चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सिंग म्हणाले की, या प्रदर्शनात आजवर  अज्ञात राहिलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रं आहेत, ज्यांच्याबद्दल नव्याने कळते आहे. देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी लढा दिला, त्यांच्याबद्दल जाणून घेणे समाधान देणारे होते. स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, अनेकांनी त्यासाठी प्राण दिले आहेत. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी इतिहासातील या सर्व महान व्यक्तींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

याप्रसंगी सी.बी.आय.च्या विशेष गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस आधीक्षक एस. आर. सिंग; जलद कृती दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण घाग, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे; सीपीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता जयंत शेकोकर, सयद मोहमद असद, आशिष गुप्ता आदी उपस्थित होते.

कोविड संबंधित नियमांचे पालन करून सर्व स्थानिक सरकारी कार्यालयातील अधिकारी–कर्मचारीवर्ग, विद्यार्थी आणि इतर नागरिक यांच्यासाठी 24 ते 27 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असेल. भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन आणि सवलतीच्या दरात विक्रीदेखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

“आयकॉनिक वीक”अंतर्गत अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, नांदेड, पुणे, नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली आणि मडगाव, गोवा या ठिकाणी प्रादेशिक लोक संपर्क कार्यालय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकांमध्ये जाऊन साजरा करणार आहे. याअंतर्गत परिसंवाद, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार, सायकल फेरी, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, स्वातंत्र्याचे पोवाडे गायन, कलासादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम घेतला जाणार आहे.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content