Homeब्लॅक अँड व्हाईटपेटीएमचे एनएफसी कार्ड...

पेटीएमचे एनएफसी कार्ड साऊंडबॉक्स लाँच

भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर आणि मोबाईल पेमेंट्सची अग्रणी असलेल्या पेटीएमने भारतातील पहिले ‘पेटीएम एनएफसी कार्ड साऊंडबॉक्स’ लाँच केले आहे. हे पुढील पिढीचे पेमेंट डिव्हाईस एनएफसी तंत्रज्ञान आणि मोबाईल क्यूआर पेमेंट्स एकत्र करते, जे लाखो ऑफलाईन व्यापाऱ्यांना कार्ड पेमेंटसाठी सुलभ डिव्हाईस प्रदान करेल.

पेटीएमचे नवीन एनएफसी कार्ड साऊंडबॉक्स एनएफसी कार्ड पेमेंट तंत्रज्ञानासह मोबाईल पेमेंट्समध्ये पुढील सुविधा चिन्हांकित करते. हे छोटे दुकानदारांना सुरक्षित एनएफसी कार्ड-रीडिंग तंत्रज्ञान वापरण्यास सक्षम बनवते. त्यामुळे ते क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि युपीआयसह व्यापक पेमेंट स्वीकारू शकतात. ग्राहक कार्ड टॅप करून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देऊ शकतात.

पेटीएम

१० दिवसांपर्यंत सुधारित आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीबरोबर, व्यापारी वारंवार चार्जिंग न करता पेटीएम एनएफसी कार्ड साऊंडबॉक्सचा लाभ घेऊ शकतात. त्वरित ऑडिओ पुष्टीकरण आणि व्यवहाराच्या रकमेसाठी डिस्प्ले स्क्रीनसह त्याच्या कोर फीचर्सशिवाय, हे नाविन्य व्यापाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन व्यवहार सुलभ करण्यास मदत करते. त्यामुळे त्यांचे व्यवसाय ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम आणि खर्च कमी होतात.

पेटीएमचे प्रवक्ते म्हणाले की, आम्ही भारतातील लहान व्यापाऱ्यांना नवीनतम तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन सर्व प्रकारच्या पेमेंट स्वीकारण्यासाठी सुलभ किंमतीत मदत करण्यास बांधील आहोत. आजचे ‘एनएफसी कार्ड साऊंडबॉक्स’चे लाँच पेटीएम साउंडबॉक्सच्या नाविन्याचा पुढील टप्पा आहे, जे भारतातील सर्वात प्रिय आणि यशस्वी पेमेंट डिव्हाईस आहे. पेटीएम एनएफसी कार्ड साऊंडबॉक्ससह, व्यापारी कोणत्याही युपीआय अ‍ॅपमधून मोबाईल पेमेंट आणि एकाच डिव्हाईसद्वारे एनएफसीआधारित डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारू शकतात.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content