Homeबॅक पेजपेटीएमने संपादित केला...

पेटीएमने संपादित केला १५०२ कोटींचा कार्यसंचालन महसूल

पेटीएमने आर्थिक वर्ष २०२४-२०२५च्‍या पहिल्‍या तिमाहीच्या आर्थिक निकालांची घोषणा केली आहे, ज्‍यामधून कंपनीच्या विविध घटकांमधील सुधारणा निदर्शनास येते. कंपनीने १,५०२ कोटी रूपयांच्‍या कार्यसंचालन महसूलासह ७९२ कोटी रूपयांच्‍या ईबीआयटीडीए तोट्याची नोंद केली आहे. कंपनीसाठी अलीकडच्या व्‍यत्‍ययांचा संपूर्ण आर्थिक परिणाम आर्थिक वर्ष २०२४च्‍या पहिल्‍या तिमाहीत दिसून येऊ शकतो.

कंपनीने सांगितले की, व्‍यापारी पेमेंट मेट्रिक्‍स जसे जीएमव्‍ही, जलद व्‍यापारी सक्रियीकरण आणि वाढत्‍या व्‍यापारीवर्गासह खर्च कमी करण्‍यासाठी सातत्‍याने केले जाणारे प्रयत्‍न यामुळे महसूल व नफ्यामध्‍ये वाढ होईल. आर्थिक सेवांमधून महसूल २८० कोटी रूपये राहिला, तर विपणन सेवांमधून महसूल ३२१ कोटी रूपये राहिला. तिमाहीदरमयान योगदान नफा ७५५ कोटी रूपये राहिला, ज्‍यामध्‍ये मार्जिन ५० टक्‍के होते.

पेटीएमचे प्रवक्‍ते म्‍हणाले की, आम्‍हाला आमच्‍या व्‍यापारी कार्यसंचालन मेट्रिक्‍समध्‍ये सुधारणा आणि आमच्‍या ग्राहकवर्गामध्‍ये स्थिरता दिसून येत आहे, ज्‍यामधून आमची रिकव्‍हरीची गती निदर्शनास येते. तसेच, यामधून आमच्‍या प्‍लॅटफॉर्मवरील आमचे व्‍यापारी सहयोगी व ग्राहकांचा सातत्‍यपूर्ण विश्‍वासदेखील दिसून येतो. पहिल्‍या तिमाहीत व्‍यत्‍ययांचा परिणाम दिसण्‍यात आला असला तरी आम्‍हाला भविष्‍यात शाश्‍वत विकास होत राहण्‍याचा विश्‍वास आहे.

कंपनीच्‍या ताळेबंदमध्‍ये ८,१०८ कोटी रूपये रोख आहे. तसेच, कंपनीचा पेपे कॉर्पोरेशनमध्‍ये ५.४ टक्‍क्‍यांचा स्‍टॉक संपादन अधिकार आहे. पेटीएम ग्राहकांना कर्ज, संपत्ती उत्‍पादने व विमा अशा श्रेणींमध्‍ये त्‍यांच्या गरजांनुसार सर्वोत्तम सेवा देते. कंपनीने सांगितले की, व्‍यापारी माहितीचा वापर करत कंपनीला त्‍यांच्‍या शॉप इन्‍शुरन्‍स सेवांच्‍या वितरणामध्‍ये उत्तम समन्‍वय दिसण्‍यात आला आहे. ग्राहकांसंदर्भात, एम्‍बेडेड व डीआयवाय विमा उत्‍पादने जसे मोटर विमाची उत्तम प्रगती दिसण्‍यात आली आहे. आरोग्‍य विमासंदर्भात, पेटीएम आरोग्‍य विमा, आरोग्‍यसेवा व ओपीडी फायदे यांचा समावेश असलेल्‍या उत्‍पादनांची श्रेणी देत आहे आणि व्‍यापारी सहयोगींसाठी संरक्षण प्‍लॅन्‍सदेखील लाँच केले आहेत.

कंपनीने सांगितले की, त्‍यांच्‍या प्‍लॅटफॉर्मवर साइनअप केलेल्‍या नवीन व्‍यापाऱ्यांची आकडेवारी जानेवारी २०२४ पातळ्यांवर पोहोचली आहे. तसेच, निष्‍क्रिय व्‍यापाऱ्यांकडून नवीन व्‍यापाऱ्यांकडे डिवाईसेसचे हस्‍तांतरण करण्‍याच्‍या प्रयत्‍नांमुळे व्‍यापारी ग्राहकवर्ग (किंवा डिवाईस मर्चंट्स) १.०९ कोटींपर्यंत वाढला आहे. नोएडास्थित पेमेंट्स कंपनीने सांगितले की, कंपनीला निव्‍वळ डिवाईस मर्चंट आकडेवारी आर्थिक वर्ष २०२५च्‍या तिसऱ्या तिमाहीपर्यंत आधीच्‍या दरापर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. मर्चंट पेमेंट्स कार्यसंचालन मेट्रिक्‍स पुन्‍हा जानेवारी २०२४ पातळ्यांवर परतले.

दैनंदिन सरासरी जीएमव्‍ही (विघ्‍न आणणारी उत्‍पादने वगळून) तिमाहीदरम्‍यान सतत सुधारणा दाखवत आहे आणि सकारात्‍मक राहत जानेवारी २०२४ पातळ्यांपर्यंत पोहोचत आहे. एकूण जीएमव्‍ही दर महिन्‍याला वाढत आहे आणि जून तिमाहीसाठी ४.३ लाख कोटी रूपये आहे.

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content