Homeब्लॅक अँड व्हाईटपेटीएमचा पेमेंट्स व्‍यवसाय...

पेटीएमचा पेमेंट्स व्‍यवसाय वाढवण्यावर भर

पेटीएम ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्स व मोबाईल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने गुरूवारी आपल्‍या २४व्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम)मध्‍ये अनुपालनकेंद्रित दृष्टिकोनासह लाभक्षमतेप्रती कटिबद्धतेची पुष्‍टी दिली. कंपनीने आपल्‍या मुलभूत पेमेंट्स व्‍यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे.

एजीएममध्‍ये पेटीएमचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर शर्मा यांनी क्‍यूआर कोड व साऊंडबॉक्‍स यासारख्‍या कंपनीच्‍या अग्रगण्‍य नाविन्‍यतांच्‍या माध्‍यमातून भारतातील डिजिटल पेमेंट्स क्रांतीमध्‍ये पेटीएमच्‍या मोठ्या भूमिकेला दाखवले. ते म्‍हणाले की, आम्‍ही भारतातील व्‍यवसाय आणि लघु व्‍यापाऱ्यांसाठी नेहमी जागतिक दर्जाचे उत्‍पादन निर्माण करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, त्यासाठी जागतिक बेंचमार्क स्‍थापित करत आहोत. आज, आमचा व्‍यवसाय जागतिक स्‍तरावर अनुकरणीय टेम्प्लेट बनला आहे. टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्‍समध्‍ये तेच यश संपादित करण्‍यास सज्‍ज आहे. आमची टीम तंत्रज्ञान, उत्‍पादन, व्‍यवसाय आणि कार्यसंचालन या सर्व क्षेत्रांमध्‍ये एआयचा वापर करत आहे.

पेटीएमने आपला व्‍यापारीवर्ग विस्‍तारित करण्‍यावर लक्ष केंद्रित केले असून सध्‍या जवळपास ४० दशलक्ष व्‍यापाऱ्यांना सेवा देत आहे. देशभरातील १०० दशलक्ष व्‍यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्‍याचे त्यांचे ध्‍येय आहे. अध्‍यक्ष व ग्रुप सीएफओ मधुर देवरा यांनी अर्ध-बिलियन भारतीयांना मुख्‍य प्रवाहातील अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये आणण्‍याच्‍या पेटीएमच्‍या मिशनला सादर केले. त्‍यांनी ८,५०० कोटी रूपयांच्‍या रोख शिल्‍लकीसह प्रबळ ताळेबंदाचा उल्‍लेख करत कंपनीची आर्थिक स्थिती निदर्शनास आणली.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content