Homeमुंबई स्पेशल२५ मेपर्यंत मालमत्ता...

२५ मेपर्यंत मालमत्ता कर भरा आणि दंड टाळा!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून विहित कालावधीमध्ये मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५ मे २०२४ हा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मुदतीपूर्वी करभरणा करुन संभाव्य दंडाची कारवाई टाळावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

करसंकलन व करआकारणी विभागाच्या वतीने करवसुली करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. समाजमाध्यमांद्वारे संपर्क करुन तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे कामकाज कार्यरत आहे. मालमत्ताधारकांना करभरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने पालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात आले आहे. तथापि, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालिकेने कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची नावे-

१) रिलायंस कन्स्ट्रक्शन (जी दक्षिण विभाग)– ४ कोटी ४० लाख ६४ हजार ७१६ रूपये   

२) बाबुलाल आगरवाल अॅण्‍ड आदर्स (पी दक्षिण विभाग)– ४ कोटी ३० लाख ४७ हजार रूपये

३) एसजीपी कम्‍युनिटी प्रायव्‍हेट लिमिटेड (एस विभाग)- ३ कोटी ७५ लाख १७ हजार ६१२ रुपये

४) अरिहंत रिअॅलिएटर्स (एम पश्चिम विभाग)- ३ कोटी ५५ लाख ६३ हजार ९९३ रुपये

५) टान्‍सकॉन एंटरप्रायजेस (के पश्चिम विभाग)- ३ कोटी ५२ लाख ४० हजार ३७८ रुपये

६) इंडियन फार्म्‍यास्‍युटीकल असोसिएशन (एच पूर्व विभाग)- ३ कोटी ३८ लाख ६८ हजार ७१० रुपये

७) चान्द जाम योगी स्‍मृती (एच पश्चिम विभाग)- ३ कोटी १० लाख ८२ हजार ७८९ रुपये

८) एसजीएफ एंटरप्रायजेस (पी उत्‍तर विभाग)- ३ कोटी ०७ लाख ५२ हजार ६६८ रुपये

९) हेलिसिटीट रेसिडेंसी प्रायव्‍हेट लिमिटेड (डी विभाग)- २ कोटी ७४ लाख ३८ हजार ९२७ रुपये

१०) श्री समर्थ स्‍पार्क डेव्‍हलपर्स (टी विभाग)- २ कोटी ७२ लाख ७ हजार ५० रुपये 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content