Homeटॉप स्टोरीमुंबईतली पासपोर्ट कार्यालये...

मुंबईतली पासपोर्ट कार्यालये आजपासून बंद!

महाराष्ट्राच्या “ब्रेक द चेन” उपक्रमाचा भाग म्हणून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने आज, दि. 23.04.2021पासून सर्व पासपोर्ट कार्यालय केंद्रे (पीएसकेएस) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (पीओपीकेएस)चे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय महाराष्ट्र सरकारने कोरोना संक्रमण रोखण्याच्या संदर्भात जारी केलेला आदेशानुसार आहे. या आदेशानुसार तारीख 22.04.2021 च्या रात्री 8 पासून ते 01.05.2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात सामान्य कामांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व पीएसके (PSK) आणि पीओपीएसके (POPSK)मधील सेवा आणि क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबई येथील चौकशी काउंटर 30.04.2021पर्यंत बंद राहतील.

सर्व अर्जदार, ज्यांनी आधीच त्यांच्या भेटीची वेळ निश्चित केली आहे, त्यांना सेवा प्रदाता कंपनी टीसीएसद्वारे एसएमएसद्वारे सूचित केले जात आहे. तथापि, सर्व अर्जदारांना कळवण्यात येते की, दिनांक 23.04.2021 ते 01.05.2021पर्यंत या कार्यालयाच्या कोणत्याही पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तेव्हा त्यांनी कोणत्याही पीएसके/पीओपीएसकेला भेट देऊ नये.

अर्जदार क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबई या कार्यालयात दूरध्वनीद्वारे (022-26520016/17) संपर्क करू शकतात किंवा कोणत्याही माहितीसाठी इमेल (rpo.mumbai@mea.gov.in)द्वारे संपर्क साधू शकतात.  तसेच वेबसाइट www.passportindia.gov.in / ट्विटर हैंडल (@rpomumbai) किंवा क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या फ़ेसबुक पेजच्या माध्यमातून पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content