Homeकल्चर +‘पानिपत’कार विश्वास पाटील...

‘पानिपत’कार विश्वास पाटील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ काल राजभवनात प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्य‍िक हस्तिमल हस्ती यांनाही २०२० या वर्षासाठीचा राजीव सारस्वत सन्मान प्रदान करण्यात आला.

सुप्रसिध्द साहित्यिक, कवी व हिंदुस्थान पेट्रोलियम येथे महाव्यवस्थापक (राजभाषा) पदावर कार्यरत असलेल्या राजीव सारस्वत यांचे मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबर २००८च्या अतिरेकी हल्यात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे साहित्यिकांना ‘राजीव सारस्वत सन्मान’ देण्यात येतो.

कार्यक्रमाला श्रुती संवाद अकादमीचे अध्यक्ष अरविंद राही, हिंदुस्थान पेट्रोलियमचे व्यवस्थापक पुष्प जोशी, महासचिव डॉ. अनंत श्रीमाली आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. वागीश सारस्वत, संजीव निगम तसेच इतर निवडक साहित्य‍िकांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content