स्पेशल ऑलिंपिक भारत आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग नागपूर यांच्यातर्फे किड्स महाविद्यालय, रामटेक नागपूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत पालघर जिल्ह्याने चमकदार कामगिरी करताना एकूण १० पदकांची कमाई केली. त्यामध्ये ३ सुवर्ण, ५ रौप्य, २ कांस्य पदकांचा समावेश आहे.
त्यांचे ८ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. २५०पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. पदकविजेत्या खेळाडूंचे पालघर जिल्ह्याचे समन्वयक विलास कोंगिलसर यांनी विजेत्यांचे खास अभिनंदन केले आहे.
पालघर जिल्ह्याचे पदकविजेते खेळाडू-
सुवर्ण: ओबेद डायस, सीता रावते, कल्याणी घाटाल
रौप्य: अथर्व चंदनशिवे, वर्षा शेणेरा, प्रिती भोये, आयुष दुडम
कांस्य: ओबेद डायस, अथर्व चंदनशिवे

