पणन हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे. खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे.
शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून केंद्र शासनाने हंगाम २०२३-२४करीता पुढीलप्रमाणे आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत.
पिकाचे प्रकार | आधारभूत किंमत (रुपये) | शेतकऱ्यांना प्रदान करावयाची रक्कम (रुपये) | |
धान /भात | साधारण (एफ.ए.क्यु.) | २१८३ | २१८३ |
अ दर्जा | २२०३ | २२०३ | |
भरडधान्य | ज्वारी (संकरीत) | ३१८० | ३१८० |
ज्वारी(मालदांडी) | ३२२५ | ३२२५ | |
बाजरी | २५०० | २५०० | |
मका | २०९० | २०९० | |
रागी | ३८४६ | ३८४६ |