Homeएनसर्कल'वंदे भारत'च्या स्लीपर...

‘वंदे भारत’च्या स्लीपर ट्रेनला उदंड प्रतिसाद, हातोहात तिकिटे बूक!

वंदे भारत स्लीपर ट्रेन (गाडी क्रमांक 27576)च्या कामाख्या (केवायक्यू) आणि हावडा (एचडब्ल्यूएच)दरम्यानच्या पहिल्या व्यावसायिक फेरीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पीआरएस आणि इतर साईट्सद्वारे तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर काही तासांतच गाडीतल्या सर्व जागा आरक्षित झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार दिवसांपूर्वीच, 17 जानेवारीला वंदे भारत स्लीपर ट्रेनचे (शयनयान) उद्घाटन केले. या गाडीचा वेग, आराम आणि आधुनिक सुविधांचा अनुभव घेण्याची प्रवाशांची उत्सुकता तिकीटांच्या जलद विक्रीतून काल स्पष्टपणे दिसून आली. ही गाडी उद्या, 22 जानेवारीपासून कामाख्या येथून, आणि 23 जानेवारीपासून हावडा येथून आपला पहिला व्यावसायिक प्रवास सुरू करणार आहे. या नवीन सेवेसाठी तिकीट आरक्षण खिडकी काल सकाळी 8 वाजता उघडली आणि 24 तासांपेक्षा कमी काळात सर्व वर्गांची  तिकिटे पूर्णपणे विकली गेली. यावरून नुकत्याच सुरू केलेल्या या सेमी-हाय-स्पीड सेवेबद्दल लोकांचा प्रचंड उत्साह दिसून येतो.

पहिल्याच व्यावसायिक फेरीत मिळालेला हा उल्लेखनीय प्रतिसाद, जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायी रेल्वे प्रवासाला मिळत असलेली प्रवाशांची वाढती पसंती दिसून येते. कामाख्या – हावडा वंदे भारत स्लीपरमुळे ईशान्य आणि पूर्व भारतामधील कनेक्टिव्हिटीत लक्षणीयरीत्या वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे आधुनिक सुविधा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि जागतिक दर्जाचा रात्रीच्या प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळेल. केवळ काही तासांत सर्व जागा आरक्षित होणे, हे भारतीय रेल्वेद्वारे सुरू केल्या जात असलेल्या आधुनिक रेल्वे सेवांबद्दल प्रवाशांच्या वाढत्या विश्वासाचे द्योतक आहे. यामुळे या प्रदेशातील प्रीमियम रेल्वे कनेक्टिव्हिटीमधला एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content