Homeएनसर्कल५० लाखांपेक्षा जास्त...

५० लाखांपेक्षा जास्त डाऊनलोड झाले महावितरणचे मोबाईल ॲप!

विद्युत ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेण्यापासून बिले भरणे, तक्रारी नोंदविणे आणि वीजचोरीची खबर देणे अशा विविध सुविधा असलेल्या महावितरणच्या मोबाईल ॲपला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

ॲप डाऊनलोड करून ते सतत वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या २८ लाखांपेक्षा अधिक असून महावितरणच्या एकूण ग्राहकांचा विचार करता प्रत्येकी दहापैकी एक ग्राहक हे ॲप नियमित वापरत आहे. ऊर्वरित ग्राहकांकडून ॲपचा वापर कमीअधिक कालावधीने होत आहे, असेही ते म्हणाले.

महावितरणच्या ग्राहकांना मोबाईल ॲपचा वापर करून महावितरणच्या अनेक सेवा सहजपणे मोबाईल फोनवरून मिळविता येतात. नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, त्यासाठीची कागदपत्रे अपलोड करणे आणि त्यासाठीची फी भरून नवीन कनेक्शन मिळविणे ही सुविधा ॲपमार्फत उपलब्ध आहे. या ॲपवरून ग्राहकांना आपले विजेचे बिल पाहता येते आणि भरताही येते. वीजबिलाची नोटिफिकेशन आणि बिल भरल्याची माहिती या ॲपद्वारे उपलब्ध होते, असेही सिंघल यांनी सांगितले.

ग्राहकांना वीजेच्या बाबतीत तक्रार नोंदविणे आणि आपल्या तक्रारीवर पुढे काय कारवाई झालीयाची माहिती घेणे ॲपमुळे सोपे जाते. वीजचोरीची खबर देण्याचीही सुविधा या ॲपवर उपलब्ध आहे. मोबाईल ॲपवरून ग्राहकांना आपल्या मीटरचे रिडिंग  स्वतःच भरता येते. जवळचे महावितरणचे कार्यालय अथवा बिल भरणा केंद्र कोठे आहे आणि तेथे कसे जायचे, याचीही माहिती  ॲपवरून मिळते, असे त्यांनी सांगितले.

महावितरणच्या मोबाईल ॲपवरून विजेचे बिल भरण्यासाठी एप्रिल २०२१मध्ये १० लाख ९७ हजार व्यवहार झाले होते व त्यावरून १५८ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली होती. नोव्हेंबर२०२२मध्ये व्यवहारांची संख्या १५ लाख ८९ हजार झाली होती व त्या माध्यमातून २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली होती. अर्थात या कालावधीत मोबाईल ॲपवरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या ४४ टक्क्यांनी वाढली तर भरलेल्या बिलांच्या रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नोव्हेंबर २०२२ या महिन्यात महावितरणच्या घरगुती ग्राहकांनी एकूण २१०४ कोटी रुपयांची बिले विविध माध्यमातून ऑनलाईन भरली होती. त्यापैकी मोबाईल ॲपवरून २३७ कोटी रुपयांची बिले भरण्यात आली. मोबाईल ॲपचे बिल भरण्याखेरीज अनेक उपयोग ध्यानात घेतात्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन सिंघल यांनी केले आहे.

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content