ईएसआयसीच्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीवरून असे दिसून येते की नोव्हेंबर 2023 महिन्यात 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. नोव्हेंबर 2023मध्ये सुमारे 20,830 नवीन आस्थापनांची नोंदणी करण्यात आली आणि त्यांना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणण्यात आले. यामुळे अधिक कामगारांना संरक्षण मिळाले आहे.
देशाच्या तरुणाईसाठी अधिक नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण या महिन्यात भर पडलेल्या एकूण 15.92 लाख नवीन कर्मचाऱ्यांपैकी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांची संख्या 7 लाख 47 हजार आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 47% इतके आहे.
वेतनपटाच्या आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण केले असता असे दिसून येते की, नोव्हेंबर-2023मध्ये नोंदल्या गेलेल्या स्त्री-कर्मचाऱ्यांची संख्या 3.17 लाख आहे. तसेच नोव्हेंबर-2023 मध्ये एकूण 58 तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) कर्मचाऱ्यांचीही नोंदणी झाल्याचे ही आकडेवारी सांगते. समाजाच्या प्रत्येक वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी ईएसआयसी वचनबद्ध असल्याचेच यावरून सिद्ध होते.