Homeन्यूज अँड व्ह्यूजजरांगेंप्रमाणे हाकेंच्या आंदोलनालाही...

जरांगेंप्रमाणे हाकेंच्या आंदोलनालाही आमचा पाठिंबा

ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा होता तसाच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने लेखी आश्वासन द्यावे अशी हाके यांची मागणी आहे. याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली.

महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. मराठवाड्यात सरकारी धोरणांमुळे ओबीसी विरुद्ध मराठा वाद विकोपाला गेला. दुहीचे राजकारण करणाऱ्या सरकारने यावर तोडगा काढावा. दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे सरकारने जातनिहाय जनगणना करावी, ही आमची मागणी आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहले असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यभरात बुधवारपासून पोलीस भरती सुरू होणार आहे. १७ हजार  जागांसाठी १७ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. ही पोलीस भरती अनेक वर्षांनी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या प्रचंड आहे. मात्र एका उमेदवाराला पाच ठिकाणी अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने उमेदवार कसे उपस्थित राहतील,  याचे सरकारला भान असले पाहिजे .काही ठिकाणी उन्हाचा तडाखा आहे तर काही ठिकाणी पाऊस आहे. याचा फटका पोलीस भरतीतील उमेदवारांना बसू नये. याची खबरदारी सरकारने घ्यावी. भरतीप्रक्रिया होणाऱ्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात, असेही ते म्हणाले.

 दरवर्षी नीट परीक्षेला देशभारातून २५  लाख विद्यार्थी बसतात. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करत असतात. यावेळी पहिल्यांदा देशातील ६७ विद्यार्थी ७२०पैकी ७२० गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. गुजरातच्या गोध्रा शहरातील जय जलाराम स्कूल या शाळेमधील ‘नीट’ परीक्षेचे केंद्र मिळवण्यासाठी तर तब्बल १० लाख रुपयांची बोली लागली होती. गुजरातप्रमाणे हरियाणा आणि बिहारमधील घोटाळ्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content