Homeन्यूज ॲट अ ग्लांसविरोधक लावणार मंत्र्यांच्या...

विरोधक लावणार मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीची माळ…

राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारसाठी गले की हड्डी बनलेला विषय, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे संपुष्टात आला आहे. पण, या नव्या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात फटाक्यांची माळ लागावी, तशी मंत्र्यांच्या राजीनाम्याची माळ विरोधकांकडून लावली जाणार आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वादग्रस्त विधान आणि त्यापाठोपाठ त्यांनी केलेले स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी नेमणुकीच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्य, यामुळे त्यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधक लावून धरत आहेत. त्यापाठोपाठ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मोबाईलवरून पाठवल्या गेलेल्या क्लिप्सच्या अनुषंगाने प्रसारित झालेल्या बातम्यांचा आधार घेऊन मंगळवारी शिवसेना उबाठा गटाने गोरे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर निदर्शने केली. गोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या या गटाने केली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला असला तरी माणिकराव कोकाटे आणि जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये विरोधकांकडून केली जाईल. पण, या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमीच आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येनंतर नव्या सरकारचे डिसेंबरमधील नागपूर हिवाळी अधिवेशन या विषयावरच गाजले होते. त्या अधिवेशनात या हत्त्येसंदर्भात उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तसेच पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी जाहीर केली गेली. एकीकडे मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारसाठी डोकेदुखी ठरलेला एक विषय काही प्रमाणात का होईना पण मार्गी लागला, असे वाटत असतानाच गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी सुरू केली आहे. दुसरीकडे राजीनामा दिल्यावर प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे धनंजय मुंडे यांनी केलेले ट्विट आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी कथन केलेले नैतिकतेचे कारण या विसंगतीमुळेही अजित पवार यांच्या पक्षाची आगीतून फुफाट्यात, अशी स्थिती मंगळवारी झाली आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे नाराज असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत होत्या. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्यात आणि शिन्दे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शीतयुद्ध नाही, असा दावा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केला होता. अधिवेनाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याने अजित पवार यांची राष्ट्रवादी काहीशी बँकफूटला गेल्याचे चित्रही मंगळवारी दिसले.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content