Homeकल्चर +सरदार वल्लभभाई पटेल...

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आज माहितीपट!

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 146व्या जयंतीनिमित्त चित्रपट विभाग (फिल्म्स डिव्हिजन) आज त्यांच्यावरील एक चरित्रपट दाखवून त्यांना आदरांजली वाहणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’चा एक भाग म्हणून 31 ऑक्टोबर रोजी हा माहितीपट चित्रपट विभागाच्या संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात येणार आहे.

एक दूरदर्शी स्वातंत्र्यसेनानी-नेते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन (राष्ट्रीय एकता दिवस) साजरा केला जातो.

लोहपुरुष : सरदार पटेल (20 मि / इंग्रजी / 2001 / विनायक जाधव) या चित्रपटात  सरदार पटेल यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्यात आला असून सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून बार्डोली सत्याग्रहातील त्यांची प्रमुख भूमिका यात अधोरेखित करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा  एक प्रमुख भाग म्हणून ती ओळखली जाते. भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून संस्थानांच्या विलीनीकरणात त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवरही यात भर देण्यात आला आहे.

हा चित्रपट https://filmsdivision.org/ ‘Documentary of the Week’ विभागावर  आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision वर 31 ऑक्टोबर 2021 रोजी 24  तास दाखवला जाईल.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content