Homeमुंबई स्पेशलस्वा. सावरकर स्मारकाचा...

स्वा. सावरकर स्मारकाचा ऑलिंपिक क्रीडा उपक्रम सुरू

मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जीईआय छबिलदास इंग्रजी माध्यम सीबीएसई शाळा, यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला ऑलिंपिक क्रीडा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग, फेन्सिंग, आर्चरी तसेच निवडक मुलांना रायफल शूटिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या उपक्रमानुसार सावरकर स्मारकातील काही उपक्रमांचा फायदा शाळेने आपल्या मुलांना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ४०पेक्षा अधिक मुलांना या योजनेमुळे क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांचा फायदा मिळणार आहे. याद्वारे सावरकर स्मारकात चालविण्या जाणाऱ्या तलवारबाजी (फेन्सिंग), मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग), तिरंदाजी (आर्चरी) आणि नेमबाजी म्हणजेच शूटिंग या क्रीडा प्रकारातील प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

या उपक्रमाच्या ऊद्घाटनप्रसंगी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, तुम्ही दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये नापास झालात तर तुमचे वर्ष वाया जाते. परंतु खेळात असे नसते ‘हारते हारते, जितना सिखोगे’ खेळ तुम्हाला प्रत्येक दिवशी शिकवत असतो. खेळांमुळे तुमची एकाग्रता, आकलन क्षमता वाढते. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये तुम्ही खेळांच्या अतिरिक्त गुणांमुळे जास्त टक्के मिळवू शकता. आमच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्येसुद्धा आम्ही मुलांना विविध खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. तुम्हीही विविध खेळांमध्ये सहभागी व्हा.

या कार्यक्रमात सुरुवातीला या योजनेची माहिती करून देण्यात आली तसेच सावरकर स्मारकातील विविध उपक्रमांची माहिती देणारी ध्वनिचित्रफितही दाखविण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना अहिरे यांनी प्रास्ताविक भाषण केले तसेच शाळेशी संबंधित संस्थेचे पदाधिकारी पार्सेकर, इनामदार आणि साळवी यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी जीईआय संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले.

यावेळी क्रीडाविषयक चार प्रकारांचे प्रात्यक्षिकही सादर केले गेले. तसेच तिरंदाजीचे मार्गदर्शक प्रशिक्षक स्वप्निल परब यांनीही उपस्थित मुले आणि पालक यांच्या शंकांचे निरसन केले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content