Homeचिट चॅटसामाजिक कार्यासाठी नूतन...

सामाजिक कार्यासाठी नूतन गुळगुळे यांचा गौरव

खरं तर दिव्यांग या शब्दाचा अर्थ कोणाला विचारला तर तो पटकन कोणाला सांगता येणार नाही. पण ‘अपंग’चा अर्थ सहज कोणीही सांगू शकेल. शरीराने विकलांग असलेली व्यक्ती म्हणजे अपंग. इतरांच्या मदतीशिवाय काहीही करता येत नाही, अशा अपंगांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी लढाऊ ‘माय’ अशी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होत असलेल्या नूतन गुळगुळे (संस्थापक, अध्यक्षा नूतन गुळगुळे फाऊंडेशन) यांचा त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्यासाठी ‘माय होम इंडिया’ या संस्थेने सन्मान केला. ईशान्य भारत व अन्य राज्ये यांत सांस्कृतिक बंध निर्माण करण्याकरिता ‘माय‌ होम इंडिया’ २०१०पासून ‘वन इंडिया ॲवॉर्ड’ देत आली आहे. २०२२ या वर्षीचा हा पुरस्कार अरुणाचल विकास परिषदेचे अध्यक्ष तेचि गुबिन यांना तेथील पारंपरिक श्रद्धा जागरणाच्या कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आला. याच कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात कार्यरत अन्य अनेक मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.

नुकताच मुंबई येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात त्यांचा हा सन्मान अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला विशेष उपस्थितांमध्ये अरूणाचल विकास परिषदेचे अध्यक्ष तेची गुबिन, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव आणि ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर उपस्थित होते.

नूतन गुळगुळे या मातेचा प्रेरणादायी प्रवास थक्क करणारा आहे. स्वतःच्या जन्मजात दिव्यांग मुलासोबतच समाजातील अनेक दिव्यांगग्रस्त आणि विकलांग मुलांना समाजप्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. अशा कर्तृत्ववान महिला आपल्या भूमीत जन्माला येतात, हे महाराष्ट्राचे भाग्यच म्हणावे, असे गौरोवद्गार सुनील देवधर यांनी याप्रसंगी बोलताना काढले.

या मातीत दिव्यांग मुलांसाठी अनेक मातांनी भव्यदिव्य योगदान दिले आहे. आजच्या आधुनिक युगात दिव्यांग मुलांसाठी दिव्य कार्य करणाऱ्यात नूतन गुळगुळे यांचे नाव आदराने घेतले जात असून, त्यांच्या पुढील कार्याद्वारे ते आणखी पुढे जात राहील अशी अशा करतो, असेही ते म्हणाले.

नूतन गुळगुळे फाउंडेशनची महाराष्ट्रात बहुविकलांग व्यक्तींसाठी काम करणारी एक प्रख्यात सेवाभावी संस्था अशी ओळख निर्माण झाली असून गेली सात वर्षे ध्येयपूर्ती पुरस्काराने देशातील अनेक बहुविकलांग बहुगुणी व्यक्तींचा सन्मान नामांकित मान्यवरांच्या हस्ते करण्याचे काम त्यांच्या संस्थेद्वारे केले जात आहे. कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘दिव्यांग’ बालकांकरिता विरार, अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राची निर्मिती नूतन गुळगुळे फाऊंडेशनद्वारे करण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘दिव्यांग कल्याण आयुक्तालया’ची या उपक्रमास मान्यता आहे. ‘करोना–१९’मुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील ‘दिव्यांग’ बालकासह त्याच्या एकल पालकाच्या निवासाची व्यवस्था, मार्गदर्शन, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी देणारे भारतातील हे पहिले वसतिगृह असून येथे ४० दिव्यांग मुलांच्या निवासाची व्यवस्था असणार आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content