Homeचिट चॅटआता मुलांसाठी तलवारबाजीच्या...

आता मुलांसाठी तलवारबाजीच्या प्रशिक्षणाची संधी!

मुंबईच्या दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आता तलवारबाजी, या क्रीडा प्रकारासाठी मुंबई फेंसिंग असोसिएशनच्या सहयोगाने सावरकर फेंसिंग क्लब सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तलवारबाजीत स्वारस्य असलेल्या मुलांना प्रशिक्षणासाठी एक नवे दालन खुले झाले आहे.

शनिवारी, ४ सप्टेंबरला सायंकाळी या क्लबचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वास्तुमध्ये हा दिमाखदार क्रीडा प्रकार आता शिकता येणार आहे. त्याचा आनंदही घेता येणार आहे. इंडियन ऑलिंपिक कमिटीचे जॉइंट सेक्रेटरी नामदेव शिरगावकर यांच्या प्रमुख आतिथ्याखाली झालेल्या उद्घाटन समारंभात जंप रोप असोसिएशन, मुंबईचे वर्किंग प्रेसिडेंट सुनील मोरे, डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स, महाराष्ट्र स्टेटचे डेप्युटी डायरेक्टर अनंत इंदुलकर, वुडबॉल गेमचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू हेमंत भालेराव, मुंबई फेंसिंग असोसिएशनचे सेक्रेटरी राहुल वाघमारे हे मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

समारंभाचे निमंत्रक आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी यावेळी क्लबच्या या आगळ्या उपक्रमाचे स्वागत केले. ऑलिंपिकमध्ये या क्रीडा प्रकारात प्रथमच पात्रता स्तरापर्यंत एक भारतीय खेळाडू गेली आहे. ही बाब लक्षात घेता या प्रकारच्या खेळाला प्रोत्साहन मिळणे आणि नव्या पिढीनेही त्यात प्रावीण्य मिळवणे अपेक्षित असल्याचे सांगत या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्यवीर स्मारकाचे कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते.

यानिमित्ताने मुंबई फेंसिंग असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनीही प्रात्यक्षिके करून एक वेगळीच चुणूक दाखवून दिली. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी २५२, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी उद्यान, दादर, मुंबई ४०००२८, दूरध्वनी क्रमांक ०२२- २४४६५८७७ येथे संपर्क साधावा.

एलाइट मेन्स बॉक्सिंगमध्ये विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांना सुवर्णपदक

दरम्यान, बुलडाणा येथे ३ ते ७ सप्टेंबर २०२१ यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरावरील पुरुषांसाठीच्या ९०व्या एलाइट मेन्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथील वीर सावरकर बॉक्सिंग क्लबमधील मुष्टियोद्धे मुंबई जिल्हा मुष्टियोद्ध्यांच्या चमूचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या स्पर्धेसाठी गेलेल्या चमूमधील या दोघांनी सुवर्णपदक मिळवले असून आता एलाइट मेन्स नॅशनल बॉक्सिंग चँपियनशीपसाठी कर्नाटकातील बेल्लारी येथे ते जातील. बेल्लारी येथे येत्या १५ ते २२ सप्टेंबर २०२१दरम्यान ही मुष्टियुद्ध स्पर्धा होणार आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content