Homeहेल्थ इज वेल्थआता पोलिओ लसीकरण...

आता पोलिओ लसीकरण 31 जानेवारीला!

देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहीम पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी 2021पासून सुरू केली जाणार आहे. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे, आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून राष्ट्रीय लसीकरण दिन (एनआयडी) किंवा “पोलिओ रविवार” म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोलिओ लसीकरण दिनाचा कार्यक्रम 31 जानेवारी 2021 (रविवार) रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 30 जानेवारी 2021 रोजी (शनिवारी) सकाळी 11.45 वाजता राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ लसीचे थेंब देऊन पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिनाचा शुभारंभ करतील. कोविड व्यवस्थापन आणि लसीकरण सेवा तसेच बिगर कोविड अत्यावश्यक आरोग्य सेवा एकमेकांवर विपरित परिणाम न होता सुरू राहाव्यात या आरोग्य मंत्रालयाच्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content