Saturday, February 8, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटअयोध्‍यासाठी आता हॉलिडे...

अयोध्‍यासाठी आता हॉलिडे पॅकेजेस आणि थेट बसेस

इझमायट्रिप डॉटकॉम, या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्‍हल टेक प्लॅटफॉर्मने अयोध्‍या व वाराणसीकरिता नवीन हॉलिडे पॅकेजेस् आणि प्रसिद्ध धार्मिक स्‍थळ अयोध्याकरिता थेट बसेस लाँच केल्‍या आहेत. श्रीराम मंदिराच्‍या प्रतिष्‍ठापनेसह हे विशेषरित्‍या क्‍यूरेट करण्‍यात आलेले पॅकेजेस् ब्रॅण्‍डचे या ऐतिहासिक प्रसंगाप्रती योगदान आहे. स्‍वदेशी ब्रॅण्‍ड इझमायट्रिप देशांतर्गत गंतव्‍यांचा प्रचार करण्‍याप्रती आणि देशाच्‍या सांस्‍कृतिक विविधतेला अविरत पाठिंबा देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. अयोध्‍यामधील श्रीराम मंदिराला दरवर्षी १०० दशलक्ष पर्यटक भेट देण्‍याची अपेक्षा आहे.

हॉलिडे पॅकेजेसमध्‍ये पवित्र शहर वाराणसी आणि लोकप्रिय धार्मिक स्‍थळ अयोध्‍या येथे ३-रात्र व ४-दिवस निवासाचा समावेश आहे. १३,८९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या या पॅकेजेसमध्‍ये किफायतशीर निवास पर्याय, प्रसिद्ध मंदिरे व पर्यटनस्‍थळांना भेटी, जेवण आणि प्रवासाचा समावेश आहे. हे विशेष टूर्स पर्यटकांना अद्वितीय आध्‍यात्मिक व सांस्‍कृतिक अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत, ज्‍यामुळे त्‍यांना घाटांची नयनरम्‍य दृश्‍ये पाहण्‍याची, पवित्र गंगा आरती पाहण्‍याची आणि या शहरांशी संबंधित अनेक कथांसह देशाच्‍या पौराणिक गाथेमध्‍ये सामावून जाण्‍याची संधी मिळते. ९०० रूपयांपासून सुरू होणाऱ्या अयोध्येकरिता थेट बसेस इझमायट्रिप व योलोबसच्‍या वेबसाइट आणि अॅपवरून बूक करता येऊ शकतात. ग्राहकांचा प्रवास अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी ब्रॅण्ड आकर्षक सूट व डिल्‍सदेखील देत आहे.

अयोध्या

इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सहसंस्‍थापक निशांत पिट्टी म्‍हणाले की, ‘धार्मिक पर्यटनाच्‍या ट्रेण्‍डमध्‍ये वाढ होत असल्‍यामुळे विशेषत: सरकारच्‍या उपक्रमांचे पाठबळ असलेल्‍या भारतातील देशांतर्गत गंतव्‍यांप्रती रूची वाढत आहे. श्रीराम मंदिराच्‍या प्रतिष्‍ठापनेसह वाराणसी व अयोध्येकरिता मागणी वाढल्‍यामुळे आम्‍हाला स्‍पेशल पॅकेजेस तयार करण्‍यासाठी प्रेरणा मिळाली. स्‍वदेशी व सांस्‍कृतिकदृष्‍ट्या कनेक्‍टेड ब्रॅण्‍ड इझमायट्रिप ग्राहकांच्‍या आध्‍यात्मिक व सांस्‍कृतिक महत्त्वाकांक्षी संलग्‍न राहत उत्‍साहपूर्ण प्रवास अनुभव देण्‍याप्रती समर्पित आहे. हे पॅकेजेस पर्यटकांना आध्‍यात्मिक जागृत प्रवास सुरू करण्‍याची आणि दृढ धार्मिक संबंध निर्माण करण्‍याची संधी देतात.’

इझमायट्रिपचे स्‍पेशल हॉलिडे पॅकेजेस आध्‍यात्‍म, इतिहास व शांततेचा अनुभव देतात. या विशेष पॅकेजेसच्‍या सादरीकरणासह ब्रॅण्‍डचा आपल्‍या ग्राहकांना अद्वितीय व सांस्‍कृतिकदृष्‍ट्या संबंधित अनुभव देण्‍याप्रती प्रयत्‍न अधिक दृढ झाला आहे. ही मर्यादित कालावधीची डिल पर्यटकांसाठी ३१ मार्च २०२४पर्यंत उपलब्‍ध आहे. आकर्षक दरांमध्‍ये या धार्मिक गंतव्‍यांना भेट देण्‍यासाठी, तसेच या विशेष पॅकेजेसचा आनंद घेण्‍यासाठी इझमायट्रिप डॉटकॉम वेबसाइटला किंवा अॅपला भेट द्या.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content