Homeएनसर्कलआता पेटीएमवर करा...

आता पेटीएमवर करा युपीआय स्टेटमेंट डाउनलोड

भारतातील मोबाईल पेमेंट व वित्तीय सेवा व्यासपीठ पेटीएम (Paytm) आता करभरणा, बजेट नियोजन किंवा एक्सेलआधारित खर्च ट्रॅकिंगसाठी युपीआय स्टेटमेंट सहज डाऊनलोड करण्याची सुविधा देते. केवळ काही स्टेप्समध्ये, वापरकर्ते आपला युपीआय व्यवहाराचा इतिहास पी.डी.एफ. किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करू शकतात, जे करबचतीसाठीचे दस्तऐवज, रिइम्बर्समेंट क्लेम, वैयक्तिक बजेटिंग किंवा मासिक खर्च विश्लेषणासाठी उपयुक्त आहे.

हे नवीन फिचर पेटीएमच्या आर्थिक माहितीच्या स्मार्ट व्यवस्थापनासाठी असलेल्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. पेमेंटशी संबंधित कोणतीही अडचण सोडवायची असो, मागील खर्च तपासायचा असो किंवा आपल्या सी.ए. (चार्टर्ड अकाउंटंट) किंवा आर्थिक सल्लागारासोबत माहिती शेअर करायची असो, या स्टेटमेंटमध्ये तारीख, वेळ, रक्कम, प्राप्तकर्ता नाव व इतर सर्व महत्त्वाची माहिती समाविष्ट असते, जेणेकरून प्रत्येक युपीआय व्यवहार व्यवस्थित नोंदवलेला असतो. अ‍ॅक्सिस बँक, यस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, किंवा एच.डी.एफ.सी. बँक याद्वारे लिंक असलेल्या खात्यांसाठी हे फिचर सर्व पेटीएम युपीआय वापरकर्त्यांना उपलब्ध आहे. विशेषतः जे वापरकर्ते एक्सेल वापरून आर्थिक व्यवस्थापन करतात किंवा आयकर भरतात त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

पेटीएम

पेटीएमवर आपले युपीआय स्टेटमेंट (पी.डी.एफ. किंवा एक्सेलमध्ये) कसे डाऊनलोड करावे?

1.         पेटीएम अ‍ॅप उघडा आणि होम स्क्रीनवर ‘बॅलन्स अँड हिस्टरी’ वर टॅप करा.

2.         खाली स्क्रोल करा आणि ‘पेमेंट हिस्टरी’ शेजारील तीन बिंदू असलेल्या मेनूवर टॅप करा.

3.         ‘डाउनलोड युपीआय स्टेटमेंट’ निवडा.

4.         दिनांक श्रेणी किंवा आर्थिक वर्ष निवडा.

5.         पी.डी.एफ. किंवा एक्सेल — तुमचा पसंतीचा फॉरमॅट निवडा.

6.         ‘रिक्वेस्ट’ वर टॅप करा — तुमचे स्टेटमेंट ‘रिक्वेस्टेड स्टेटमेंट्स’ विभागात दिसेल.

तुम्ही कर भरत असाल, मासिक खर्च नियंत्रित करत असाल किंवा आर्थिक दस्तऐवजासाठी युपीआय इतिहास डाऊनलोड करत असाल तर पेटीएमचे हे सोपे युपीआय स्टेटमेंट डाऊनलोड फिचर कोणत्याही अडचणीशिवाय विश्वासार्ह, जलद आणि सुरक्षित मार्गाने आपली माहिती व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करते.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content