Homeब्लॅक अँड व्हाईटकठुआत साकारणार उत्तर...

कठुआत साकारणार उत्तर भारतातले पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय

उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा भागात उभारले जाईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल कठुआ येथे दिली. केंद्र सरकारच्या निधीतील 80 कोटी रुपये खर्च करून हे महाविद्यालय उभारले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सातत्याने विकासाची वाटचाल सुरू ठेवत डॉ. सिंह यांनी जसरोटा गावातील महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेला भेट दिली. सध्या या जागेवर कुंपण भिंतीचे काम सुरू झाले आहे. यावेळी आयुष विभागातील अभियंते आणि वरिष्ठ तज्ञांनी मंत्र्यांना संस्थेबाबत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर या महाविद्यालयाची मागणी मांडली होती, असे त्यांनी सांगितले. 70-80 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले, उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय कठुआच्या लोकांसाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. ही संस्था 8 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर विस्तारित असून शेजारील तीन एकर क्षेत्रदेखील योग्य वेळेत महाविद्यालयाच्या जागेबरोबर जोडले जाईल, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.

Continue reading

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....

येत्या रविवारी आस्वाद घ्या ‘त्रिधा’चा

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची...

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...
Skip to content