Homeएनसर्कलउद्यापासूनच्या अकृषी विद्यापीठांच्या...

उद्यापासूनच्या अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन!

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या अत्यंत कडक निर्बंधांमुळे उद्यापासून होणाऱ्या राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केला.

सरकारने लागू केलेले निर्बंध १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. यामध्ये संचारबंदीचादेखील समावेश आहे. त्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणेच परीक्षांचे नियोजनदेखील काहीसे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्यापासून १३ अकृषी विद्यापीठांमधल्या सर्व वर्षांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असे ते म्हणाले.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे पर्याय देण्यात आले होते. विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरूदेखील केल्या होत्या. मात्र, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

परीक्षा ऑनलाईन

कोविडच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण कठीण झाल आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरविले. या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंना करण्यात आली आहे. या परीक्षांमधून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हा निर्णय उद्यापासूनच लागू करण्यात येईल. सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. पण उद्यापासून त्या शक्य नसल्यामुळे सर्वच कुलगुरूंनी सरकारला विनंती केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी संबंधित विद्यापीठांनी घ्यायची आहे. या परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा सर्वच वर्गांच्या परीक्षांचा समावेश असेल, असेही सामंत म्हणाले.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content