Homeमुंबई स्पेशलसीताराम कुंटेंना मुदतवाढ...

सीताराम कुंटेंना मुदतवाढ नाकारली, प्रमुख सल्लागारपदी नेमणूक!

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास केंद्रीय समितीने नकार दिल्यानंतर ते आज आपल्या पदावरून पायऊतार झाले. त्यानंतर लगेचच ठाकरे सरकारने त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक केली.

सीताराम कुंटे आज सेवानिवृत्त होणार होते. त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसा प्रस्ताव सरकारने केंद्रीय समितीकडे पाठवला होता. परंतु, या समितीने हा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर आज संध्याकाळी कुंटे यांनी आपल्या मुख्य सचिव पदाची सूत्रे आपले ज्येष्ठ सहकारी, राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त तसेच अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे सोपवली. त्यानंतर लगेचच सरकारने कुंटे यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक केली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content