Homeचिट चॅटआयशर वाहनचालक प्रशिक्षण...

आयशर वाहनचालक प्रशिक्षण संस्थेचे गडकरींनी केले उद्घाटन!

आयशर ट्रक्स आणि बसेसने फिनिक्स फाऊंडेशनच्या भागीदारीत राज्यातील वाहनचालकांच्या सक्षमीकरणासाठी फिनिक्स-आयशर इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हर ट्रेनिंग अँड रिसर्चची स्थापना केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या संस्थेचे नुकतेच उद्घाटन केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासोबत सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत लातूर येथे स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट व्यावसायिक वाहने चालवणाऱ्या वाहनांच्या चालकांना सर्वसमावेशक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांची मुख्य क्षमता वाढवणे, हे आहे. जेपी वर्मा, उपाध्यक्ष आफ्टर मार्केट – आयशर ट्रक्स आणि बसेस आणि पाशा पटेल, अध्यक्ष – फिनिक्स फाऊंडेशन यांच्या यावेळी उपस्थित होते.

आयशरकडे आधीच आठ ड्रायव्हर प्रशिक्षण संस्था आहेत. तेथे नवीन ड्रायव्हर्ससाठी पूर्व-परवाना प्रशिक्षण दिले जाते. आयशर १२ प्रादेशिक ड्रायव्हर ट्रेनर्स आणि दरवर्षी सुमारे २० हजार ड्रायव्हर्सद्वारे नियमित ड्रायव्हर प्रशिक्षण कार्यक्रमदेखील आयोजित करते. या कार्यक्रमांद्वारे आतापर्यंत देशभरात २ लाखांहून अधिक चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

फिनिक्स-आयशर संस्था १२ एकर क्षेत्रात पसरलेली आहे. ती ड्रायव्हिंग सराव ट्रॅक, ऑटोमोबाईल लॅब, प्रशिक्षण वाहने, उपकरणे आणि आयशरने प्रदान केलेली प्रशिक्षण सामग्री यासारख्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. चालकांच्या सोयीसाठी विकसित केलेल्या वसतिगृहात १५० चालकांना राहता येणार आहे. संस्था केवळ नवीन ड्रायव्हर्सनाच प्रशिक्षित करणार नाही तर सध्याच्या ड्रायव्हर्सचे नवीन तंत्रज्ञानासह कौशल्य बळकट करेल.

आयशरने गेल्या काही वर्षांत ड्रायव्हरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः ड्रायव्हर्सशी संवाद साधण्यासाठी अत्यंत परस्परसंवादी प्रशिक्षण सामग्री विकसित केली आहे. प्रशिक्षणाचा मुख्य हेतू म्हणजे सकारात्मक ड्रायव्हिंग संस्कृती.. जसे की, रस्त्यावरील चिन्हे आणि खुणा यांचे पालन करणे, सुरक्षित ड्रायव्हिंग, सकारात्मक रस्ता वर्तन.

या प्रशिक्षणात इंधन कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि वाहन चालकांना नवीनतम वाहन तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ड्रायव्हिंग तंत्रावर भर देण्यात आला आहे. फिनिक्स-आयशर इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हर ट्रेनिंग अँड रिसर्च व्यावसायिक वाहनचालकांमध्ये रस्तासुरक्षा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी तसेच सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रभावी संसाधन म्हणून काम करण्याचा मानस आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content