Homeब्लॅक अँड व्हाईटइंडिया क्लायमेट एनर्जी...

इंडिया क्लायमेट एनर्जी डॅशबोर्ड 3.0चा शुभारंभ!

नीती आयोगाने इंडिया क्लायमेट एनर्जी डॅशबोर्ड 3.0 जारी केले. सरकारद्वारे प्रकाशित स्त्रोतांवर आधारित हा देशातील वन-स्टॉप प्लॅटफॉर्म आहे जो ऊर्जा क्षेत्र, हवामान आणि संबंधित आर्थिक डेटाबेस विषयी जवळपास वास्तविक वेळेत डेटा पुरवतो.

ICED 3.0 हा वापरण्यास अनुकूल प्लॅटफॉर्म असून वापरकर्त्यांना विश्लेषणात्मक इंजिनचा वापर करून डेटापर्यंत सहजपणे पोहचण्यास आणि विश्लेषण करण्यास सक्षम बनवते. मुख्य आव्हाने ओळखताना ऊर्जा आणि हवामान क्षेत्रांबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करेल.

डेटाच्या उपलब्ध मापदंडांमधून हे पोर्टल अधिक माहिती समजून घेईल. परिणामी स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने भारताच्या संक्रमण प्रवासाच्या प्रगतीवर देखरेख  ठेवण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. हा डॅशबोर्ड 500 पेक्षा जास्त मापदंड, 2000 हून अधिक इन्फोग्राफिक्स आणि दृश्य स्वरूपात डेटा सादर करण्यासाठी अनेक कल्पना उपलब्ध करून वापरकर्त्यांना भारताच्या ऊर्जा क्षेत्राची समग्र माहिती मिळवण्यास उपयुक्त आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content