Homeमुंबई स्पेशलएनआयएफटीने मुंबईत केला...

एनआयएफटीने मुंबईत केला अनोखा ‘खादी फॅशन शो’!

भारतात प्राचीन काळापासून खादी वस्त्र वापरले जात होते. भारताच्या वस्त्रोद्योगाची ओळख असलेले खादी कापड स्वातंत्र्यलढ्यात तर ब्रिटिशांविरोधात एक शस्त्र म्हणून वापरले गेले. आज जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताची उभारणी करत विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करतो आहोत, अशा वेळी देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेले हे वस्त्र लोकांमध्ये, विशेषतः तरुण पिढीमध्ये अधिक लोकप्रिय व्हावे, यादृष्टीने, मुंबईतल्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था म्हणजेच एनआयएफटी मुंबईत ‘खादी फॅशन शो’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

खादी

फॅशन क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या मेहर कॅस्टेलीनो आणि बिर्ला सेल्युलोज डिझाईनचे प्रमुख, नेल्सन जाफरी यांच्या हस्ते या खादी फॅशन शोचे उद्घाटन झाले. या फॅशन शोसाठी अनेक डिझाईनर्सनी आपले महत्त्वाचे योगदान दिले.

खादीच्याच विविध पारंपरिक वस्त्रांना, साड्यांना आधुनिक डिझाईनचे कोंदण लावत, अत्यंत उच्च अभिरुचिसंपन्न डिझाईन्स यावेळी तयार करण्यात आले होते. ह्या संस्थेतील विद्यार्थ्यांनीदेखील आपल्या सर्जनशीलतेचा कल्पकतेने वापर करत, विविध वस्त्र तयार केले होते. त्यांनी तयार केलेल्या खादीच्या आधुनिक वस्त्र प्रावरणांनी ह्या फॅशन शोची रंगत अधिकच वाढली. अनेक विद्यार्थ्यांनी क्राफ्ट बेस्ड डिझाईन्सपण तयार केले होते.

देशातल्या विविध वीणकरांची मदत घेऊन अनेक वस्त्रे तयार करण्यात आली होती. या वस्त्रांचे रेखाटन, संरचना, नियोजन आणि इतर सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांनीच केल्या. एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार सर्व आखणी करण्यात आली. खादी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तेच ते कुर्ते आणि ठराविक प्रकारचे कपडे येतात. या साचेबद्धतेतून खादीला मुक्त करत, नव्या स्वरूपात सादर करण्याच्या उद्देशाने हा फॅशन शो भरवण्यात आला होता.

Continue reading

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...
Skip to content